नंदुरबार : नंदुरबारातील चार कोरोना रुग्ण बरे झाल्याने आता शहादावासीयांना देखील आस लागली आहे. शहाद्यात गेल्या आठ दिवसात नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. जे ९ रुग्ण आढळून आले होते त्यांच्या संपर्कातील इतर लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शिवाय वेळोवेळी आरोग्य तपासणीत देखील त्या भागातील नागरिकांमध्ये कोरोनाची कुठलेही चिन्हे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे आता दाखल ८ रुग्णांच्या नवीन अहवालांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या रुग्णांची प्रकृती देखील ठणठणीत असून झपाट्याने त्यात सुधारणा देखील होत आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.’शहाद्यात युवा व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या व्यापाºयाच्या संपर्कातील १८ गावांमध्येही भिती होती. परंतु सुदैवाने ग्रामिण भागात कुणीही रुग्ण आढळून आला नाही.’मयताच्या कुटूंबातील इतर बाधीतांची प्रकृती सुधारत आहे. शिवाय इतर तिघांचीही प्रकृती सुधारल्याने शहादाचेही कोरोनामुक्तीकडे लक्ष लागून आहे.
शहाद्यालाही आस लागून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 13:41 IST