शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर शिवारात रेल्वेखाली आल्याने पती-पत्नी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:16 IST

तारापूर शिवारातील घटना : गावात हळहळ

विसरवाडी : सुरत-भुसावळ लोहमार्गावर तारापूरनजीक रूळ ओलांडत असताना अज्ञात रेल्वे इंजिनखाली अपघात होऊन पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सुजित देविदास वळवी (२२) व त्याची पत्नी करिष्मा सुजित वळवी (२०) रा.तारापूर, ता.नवापूर असे मयतांची नावे आहेत. पोलीस सूत्रानुसार, रविवार, १० मार्च रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान सुरत-भुसावळ लोहमार्गावरील तारापूर गावाच्या शिवारात पोल क्रमांक १२१ ते १२८ दरम्यान हा अपघात घडला.सुजित व करिश्मा हे दोघे पती-पत्नी रेल्वे रुळ ओलांडत असताना अज्ञात रेल्वे इंजिनखाली अपघात होऊन कापले गेल्याने जागीच ठार झाले. या घटनेत तरुण पती-पत्नीचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहेयाबाबत मुलाचे आजोबा सेवा रडत्या वळवी यांनी विसरवाडी पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार भीमसिंह ठाकरे हे करीत आहेत.