शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो स्वयंसेवकांचा कोरोनामुक्तीच्या लढ्यात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात आणि देशात सध्या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणेसह स्वयंसेवी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यात आणि देशात सध्या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणेसह स्वयंसेवी संस्था आणि विद्यापीठे, शैक्षणिक संस्थाही सहभागी झाल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग या कामात सहभागी झाला आहे.जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शेकडो स्वयंसेवक वेगवेगळ्या उपक्रमातून प्रबोधन व प्रत्यक्ष कृती करत प्रशासनाला हातभार लावीत आहेत. सरकारने सूचित केल्याप्रमाणे सगळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असलेले आरोग्य सेतू हे अ‍ॅप ४१५ स्वयंसेवकांनी डाऊनलोड केले आहे. ते ज्या गावाला आहेत तेथील नागरिकांनाही हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करत आहेत.सोशल डिस्टन्स लक्षात घेऊन काही गावांमध्ये रासेयो विद्यार्थिनी आशा वर्कर सोबत जनजागृती करत आहेत तर काही स्वयंसेवक सार्वजनिक बैठकीच्या ठिकाणी आॅइल अथवा केमिकल टाकून एकत्र बसणार नाहीत त्यासाठी गर्दी कमी करत आहे. गावात विषाणुचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस दलामार्फत ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. यातही स्थानिक गावांमध्ये २५ ते ३० स्वयंसेवक पोलीस मित्र म्हणून मदत करीत आहे.सॅनिटायझरची निर्मिती व वापराची पद्धत यासाठी अक्कलकुवा येथील विज्ञान महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी डॉ.विजय पाटील यांनी महाविद्यालयाच्या लॅबमध्ये स्वत: हाताने सॅनिटायझर तयार करून प्रत्येकी ५० मिली चे ३०० बॉटल सोरापाडा गाव व परिसरात वाटप केले.या वेळी २० स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी रांगोळी, पोस्टर, कविता, गाणे व मनोगतातून जनजागृती केल्या. एस.टी.को. आॅफ एज्युकेशनच्या विज्ञान महाविद्यालयातील प्रा.भूषण निकम यांनी संस्थेच्या सहकार्याने स्वयंसेवकांच्या माध्यमातून अन्न धान्याच्या सहा हजार कीट वाटप केल्या. याशिवाय मास्क कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक देत आहे.नवापूर महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी छाया गावीत यांनी संस्था, नगरपालिका व आमदार शिरीष नाईक आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने एक हजार मास्क वाटप केले. तसेच ३० स्वयंसेवक शहरात आरोग्य सर्वेक्षण करत आहेत. जी.टी. पाटील महाविद्यालय, जिजामाता महाविद्यालय, साने गुरूजी महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, संत जगनाडे महाविद्यालय खापर, विसरवाडी येथील कला महाविद्यालय, बामखेडा येथील कला महाविद्यालय व इतर महाविद्यालयाचे २९१ स्वयंसेवकही गावात फवारणी, स्वच्छता, आरोग्य, रांगोळी, पोस्टर, कविता, गाणे, भाषण, अभिनय, गरजुंना अन्नधान्य इतर जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी स्थानिक पातळीवर मेहनत घेऊन प्रशासनाला सहकार्य करत आहे.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ.माहुलीकर, कुलसचिव डॉ.पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील व सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य, राज्य संपर्क अधिकारी डॉ.अतुल साळुंखे, विभागीय संचालक डॉ.कार्तिकेयन, विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.माधव कदम, विभागीय समन्वयक डॉ.बी.एस. पाटील, डॉ.सुनील गरुड व कार्यक्रम अधिकारी मेहनत घेत आहे.