शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

खाकीतील माणसांनी जपली माणूसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरात फिरणा:या वेडसर व्यक्तीस अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आधार देत दिवाळीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरात फिरणा:या वेडसर व्यक्तीस अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आधार देत दिवाळीच्या दिवशी त्याला अंघोळ करुन देत कपडे आणि फराळ दिला़ पोलीस कर्मचा:यांनी स्वत: त्या वेडसर व्यक्तीची आंघोळ करुन देत जपलेल्या अनोख्या माणूसकी धर्माची शहरात चर्चा सुरु आह़े अक्कलकुवा शहरात काही दिवसांपासून एक वेडसर व्यक्ती फिरत असल्याचे वेळोवेळी शहरवासियांच्या नजरेस पडत आह़े कोणीही काळजी घेणारे नसल्याने वाढलेली  दाढी, डोक्याचे केस, अंगावर फाटलेले कपडे आणि अनेक दिवसांपासून पाण्याचा स्पर्शही न झालेला नसल्याने त्याचा मूळ चेहरा हा पूर्णपणे काळाकीट्ट झाला होता़ रविवारी  अक्कलकुवा येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी  पोलीस ठाण्यात आणून न्हाव्याला बोलावून डोक्यावरील केस व वाढलेली दाढी काढून दिल़े वर्षभरापासून मळलेले कपडे घालणा:या त्याची साबणाचे अंघोळ घालून नवीन कपडेही दिल़े त्या निराधाराला मिठाई देत दिवाळीच्या दिवशी पोलीस निरीक्षक डांगे यांनी तोंडही गोड करुन दिल़े यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, योगेश्वर बुवा, शुभम भंसाली , पोलीस कॉन्स्टेबल संदीप महाले, रविंद्र साळवे, होमगार्ड राजेश तंवर, मनोज गुलाले, बापू राठोड आदी उपस्थित होते.अक्कलकुवा शहरातून जाणा:या ब:हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर भणंग अवस्थेत फिरणा:यांची संख्या मोठी आह़े अशा व्यक्तींना पोलीस ठाण्याकडून वेळावेळी मदत करण्यात येत आह़े गेल्यावर्षीही अक्कलकुवा पोलीस ठाण्याने एकाची मदत करत त्याला घरार्पयत पोहोचवले होत़े शहरातील इतरही बेवारस अवस्थेत फिरणा:या वेडसर व्यक्तींवर पोलीसांकडून लक्ष ठेवण्यात येत असून वेळावेळी त्यांची विचारपूस करण्यात येत आह़े