लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर, गोगापूर, दामळदा, कवळीथ, टुकी येथील गोमाई नदीपात्रातून व जवखेडा येथील सुखनाई नदीपात्रातून रोज दिवस-रात्र अवैधपणे मोठय़ा प्रमाणावर वाळूचा उपसा होत आहे. मात्र याकडे स्थानिक महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचा:यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.परिसरात वाळूचा उपसा करून ही वाळू महागडय़ा दराने विकली जाते. राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध वाळूचा उपसा स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी यांना दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे. शहादा तालुका आधीच दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला होता. परिसरात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असताना शहादा तालुक्यातील भागापूर, गोगापूर, दामळदा, कवळीथ, टुकी येथील गोमाई नदीपात्रातून तसेच जवखेडा येथील सुखनाई नदीपात्रातून जेसीबी मशीनच्या सहाय्याने महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून मोठय़ा प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. या वाळू उपशामुळे भूजल पातळी कमी होत आहे. या बाबीकडे स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी व तसेच महसूल विभाग सोयीस्करपणे दुर्लक्षच करीत आहेत.जिल्हाधिका:यांच्या कारवाईनंतरहीपरिस्थिती ‘जैसे थे’ नुकतीच बदली झालेले जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या आदेशाने जून महिन्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारी 31 वाहने जप्त करण्यात आली होती. गुजरात राज्यातील हातोडा येथील तापी नदीपात्रातून घेऊन जाणारी अवैध वाळू नंदुरबारमार्गे नाशिक येथे घेऊन जाताना जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. परंतु ग्रामीण भागात अवैधरित्या मोठय़ा प्रमाणावर वाळू वाहतूक ‘जैसे थे’ सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराज व्यक्त होत आहे.
भागापूर परिसरातून वाळूचा प्रचंड उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:30 IST