शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बिलगावचा धबधबा आणखी किती बळी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 12:34 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील उदय नदीवरील धबधबा अनेकांचा बळी घेत ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील उदय नदीवरील धबधबा अनेकांचा बळी घेत आहे. या ठिकाणी प्रशासनाने संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अभाविपचा एक खंदा कार्यकर्त्याला बुधवारी याच धबधब्यात जीव गमवावा लागला. सातपुडा पर्यटनाची खाण आहे. अनेक दऱ्या, उंचच उंच पहाड, उंचावरून कोसळणारे धबधबे, हिरवळ, खळाळून वाहणारे नाले हे निसर्ग सौंदर्य पहाण्याची मजा काही औरच आहे. पावसाळ्याचे चार महिने आणि हिवाळ्याचे दोन महिने येथील निसर्ग सौंदर्य काही औरच असते. याच सौंदर्यातील खाणीमधील बिलगाव येथील बारा धा-या धबधबा. युवकांचे खास आकर्षण असलेल्या या धबधब्याच्या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटनासाठी युवकांची गर्दी होते. त्यातच अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. धडगाव तालुक्यातील दऱ्याखोऱ्यातून खळाळून वाहणारी उदय नदी अनेक गाव, पाड्यांची तहाण मिटवते. बिलगाव येथे नैसर्गिक उत्तम साईट लाभल्याने येथे लहान, मोठे १२ धबधबे निर्माण झाले आहेत. त्यामुळेच त्याला बाराधाऱ्या धबधबा असे नाव पडले आहे. येथील सुंदर नैसर्गिक वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. परंतु येथील पाण्याचा अंदाज अनेकांना येत नाही. त्यामुळे येथील डोहात बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षांपूर्वी तळोदा येथील दोन सख्खे भावांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या वर्षी देखील एकाचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वीही काहींचा मृत्यू झाला आहे. चार वर्षात सहा जणांना येथे जलसमाधी मिळाली आहे. वारंवारच्या होणाऱ्या घटना पहाता या ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना व मार्गदर्शक फलक लावणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

  • वीज निर्मिती प्रकल्प 
  •  नर्मदा आंदोलनातर्फे या ठिकाणी वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पावर आधारीत एका चित्रपटाची देखील निर्मिती करण्यात आली आहे.  
  •  १२ वर्षांपूर्वी आलेल्या पुरात हा प्रकल्प वाहून गेला होता. 
  •  उदय नदी येथून पुढे नर्मदा नदीला मिळते. त्यामुळे बिलगावला नदीचा पाण्याचा वेग अधीक राहत असतो. परिणामी धबधबेही प्रवाही असतात. 
  •  येथून जवळच नर्मदा नदी बॅक वाॉटरचा भूषा पॅाईंट देखील आहे.