लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील रायखेड येथे धाडसी घरफोडीत 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली.रायखेड येथील संजय भाईदास पाटील यांच्या गावातील मध्यभागी असलेल्या घराच्या मागील दाराचा कडीकोंडा तोडून चोरटय़ांनी आत शिरून लोखंडी कपाट तोडून मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीस आले. संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री दोन ते पाच वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश केला व घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून 10 हजार रोख व 32 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा 42 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच म्हसावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. या वेळी रायखेड पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार काशीनाथ सोडवे, घनश्याम सूर्यवंशी, युवराज पाटील व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे भटू धनगर, दीपक गोरे व फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन हाताचे ठसे घेतले.
घरफोडीत 42 हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:19 IST