शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडय़ा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:10 IST

नंदुरबारात खळबळ : लाखोंचा ऐवज लंपास, पोलिस सूस्त

नंदुरबार : शहरातील विविध भागात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाली. तिन्ही ठिकाणाहून लाखोंचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे.पहिली घटना देवचंदनगर भागात घडली. एलआयसी एजंट दुर्गेश दिलीप राठोड  यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी चोरी केली. घरातील तीन लाख 91 हजार 700 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागीने व रोख रक्कमेचा त्यात समावेश आहे. सकाळी घटना उघडकीस आल्यावर पोलिसांना कळविण्यात आले. दुर्गेश राठोड यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक के.एस.पवार करीत आहे.दुसरी घटना यशोधन पार्क, दुधाळे शिवार येथे घडली. संतोष गोविंदराव बिराजदार हे बाहेरगावी गेल्याने त्यांच्या बंद घराचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी चोरी केली. घरातील 63 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात दोन तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, कर्णफुले, चांदीची मुर्ती व हजार रुपये रोख असा एकुण 63 हजार 500 रुपयांचा ऐवजचा समावेश आहे. संतोष बिराजदार यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सुनील बि:हाडे करीत आहे.तिसरी घटना श्रीराम सोसायटीत घडली. कन्हैया लक्ष्मणदास झामनाणी यांच्याही बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी चोरी केली. 20 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेला. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार सैय्यद करीत आहे.