लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सातत्याने खोलवर जात असलेल्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीने वैतागलेल्या शेतक:यांपुढे आता वेगाने वाहणा:या उष्ण वा:यांनी संकट उभे केलं आहे. कारण या वा:यांनी शेतक:यांच्या परीपक्वकेळीच्या बागा उध्वस्त केल्याचे चित्र आहे. विशेषत: मोड, बोरद, तळवे, आमलाड, प्रतापपूर, मोहीदा परिसरातील बागांना याचा फटका बसल्याचे म्हटले जात आहे. शेतक:यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावल्याने प्रशासनाने याची दखल घेऊन दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत करावी, अशी या नुकसानग्रस्त शेतक:यांची मागणी आहे.गेल्या वर्षी तळोदा तालुक्यात सरासरीच्या 50 टक्केही पाऊस झाला नाही. तरीही ज्या ठिकाणी पुरेसे पाणी होते अशा ठिकाणी शेतक:यांनी केळी, पपई या सारखी नगदी पिके लावलीत. साधारण तीन ते चारे हेक्टर क्षेत्रात लावणी करण्यात आली आहे. त्यातही केळीचे क्षेत्र अधिक आहे. दिवाळीपासूनच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. त्यातही मार्चपासूनच भूगर्भातील पाण्याचा पातळीत घट होत आहे. त्यातही मार्चपासूनतर ती पार खोलवर गेली आहे. कुपनलिकेत कृषीपंपाचे पाईप खाली उतरवून शेतकरी प्रचंड वैतागला आहे. अशा विदारक स्थितीत कसे बसे केळीचे पीक वाचवून परिपक्वतेच्या मार्गावर नेले आहे. परंतु अलिकडे 45 डिग्री तापमानाबरोबरच वेगवान उष्णवारे सुरू झाल्यामुळे त्याचा फटका केळीच्या बागांना बसत आहे. कारण वा:यांमुळे निसवाड झालेली केळीची झाडे मोडून पडत आहेत. विशेषत: कढेल, खेडला, मोड, बोरद, तळवे, आमलाड, मोहिदा, प्रतापपूर भागात हा प्रकार अधिक दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे. कुठे 20 टक्के, कुठे 50 तर कुठे 17 टक्के बागांना याचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.वास्तविक अत्यंत दुष्काळी परिस्थितीतही शेतक:यांना सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन पीक वाढीसाठी प्रयत्न केले. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे त्याच्या माथी कर्जाचा बोजा वाढला आहे. आधीच खरीप हंगामातील इतर पिकांच्या घटीचा फटका त्याला बसला होता. यातून कसा बसा सावरत केळीवर आशा पल्लवीत होत्या. तथापि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका त्यांना बसल्याची व्यथा शेतक:यांनी बोलून दाखविली. प्रशासनाने याप्रकरणी दखल घेऊन अशा शेतक:यांची चौकशी करून आपल्या महसुली कर्मचा:यांना पंचनाम्याचे आदेश देऊन शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी शेतक:यांची मागणी आहे.गेल्या सात ते आठ दिवसांपासून सुरू असलेल्या वेगवान उष्ण वा:यांमुळे तालुक्यातील कढेल शिवारातील रामदास फकिरा शिंदे या शेतक:यांची परिपक्वझालेली केळीची बाग भुईसपाट झाली आहे. साधारण तीन एकर क्षेत्र होते. त्यातील 70 टक्के पिकाला वा:याचा फटका बसला आहे. या शेतक:याने टिश्यूचे बी आणून लागवड केली होती. त्यात महागडय़ा रासायनिक खतांचा वापर केला होता. पाण्याचेही सुयोग्य नियोजन करून केळीची बाग फुलविली होती. साधारण तीन लाख रुपये खर्च केला होता. मात्र निसर्गाच्या आपदेमुळे संपूर्ण खर्च वाया गेला आहे. निदान शासनाने तरी आर्थिक मदत द्यावी, अशी शेतक:यांची अपेक्षा आहे.
उष्ण वा:याच्या झळांनी केळी उत्पादक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:03 IST