शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या ‘12 टक्के’ ओलाव्यात अडले ‘घोडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात गुरुवारपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला प्रारंभ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीच्या पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात गुरुवारपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला प्रारंभ होणार आह़े बाजार समितीने नियुक्त केलेले परवानाधारक व्यापारी येथे कापूस खरेदी सुरु करणार असून सीसीआयने 12 टक्के ओलावा असलेला कापूस खरेदी करण्याचा नियम कायम ठेवला आह़े      नंदुरबार बाजार समिती गेल्या आठवडय़ात कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आल्यानंतर काही वेळातच खरेदी बंद पडली होती़ बाजारात खरेदीसाठी आलेल्या सीसीआयच्या प्रतिनिधींनी 8 ते 12 टक्के  ओलावा (मॉईश्चर) असलेल्या कापसाचीच खरेदी करण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले होत़े सीसीआयच्या या अटीनंतर शेतक:यांनी कापूस खरेदी बंद पाडली होती़ यावर तोडगा काढत बाजार समितीने बुधवारी व्यापारी, सीसीआयचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांची बैठक घेत चर्चा केली होती़ या चर्चेतून गुरुवारपासून खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येऊन सीसीआय अटीशर्तीवरच कापूस खरेदी करेल असे स्पष्ट करण्यात आले आह़े सीसीआयकडून नंदुरबार केंद्रात 5 हजार 450 रुपये प्रतिक्विंटल कापूस खरेदी करण्यात येणार आह़े सीसीआयला कापूस देणा:या शेतक:यांनी कापूस पूर्णपणे कोरडा करुन आणावा असे सीसीआयपे कळवले आह़े परंतू  ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे ओली जमिन आणि रात्री पडणारे दव यामुळे कापसातील ओलावा थेट 20 टक्क्यांच्यापुढे गेला आह़े यातून आधीच महिनाभर कापूस हंगाम लांबल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक:यांनी आहे त्याच ओलाव्यानुसार सीसीआयने कापूस खरेदी करावी अशी मागणी कायम ठेवली आह़े गुरुवारी सकाळी येथे होणा:या कापूस खरेदीकडे लक्ष लागून राहणार आह़े 

दरम्यान पळाशी येथील खरेदी केंद्रावर बुधवारी सकाळी 10 ते 15 वाहनांमधून कापूस विक्रीसाठी शेतक:यांनी आणला होता़ या कापसाची परवानाधारक व्यापा:यांकडून खरेदी करण्यात आल्याची माहिती आह़े गुरुवारी सकाळी मार्केट कमिटीच्या दरांनुसार कापूस खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े परवानाधारक जिनिंग मिल व्यापारी हा कापूस खरेदी करणार आहेत़ परंतू गेल्या आठवडय़ात खरेदी सुरु झाल्यानंतर शेतक:यांनी व्यापा:यांना नकार सीसीआयने कापूस घ्यावा अशी मागणी केली होती़ 

जिल्ह्यातील यंदा 1 लाख 21 हजार हेक्टर्पयत कापसाची लागवड करण्यात आली होती़ पावसाने उशिराने दिलेल्या हजेरीमुळे कापूस लागवडही उशिराने झाली होती़ यातून प्रारंभी झालेली अतीवृष्टी आणि ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी यामुळे पिकाचे नुकसान झाले आह़े यात आता कापूस विक्री करताना ओलाव्याचे कारण पुढे करण्यात आल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली आह़े एकीकडे शेतीक्षेत्रात ही समस्या असताना दुसरीकडे राष्ट्रीय बाजारपेठेत सरकीच्या दरांबाबत अनियमितता असल्याने खरेदी करण्याबाबत व्यापा:यांमध्ये अद्यापही उदासिनता आह़े कापसाच्या गाठींची निर्मिती गेल्या काही वर्षात वाढल्याने कापसाचे दर हे सातत्याने कमी झाल्याचे दिसून आले आह़े यंदाही कापसाचा पुरवठा हा अधिक होण्याची शक्यता आह़े