शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

घोड्यांच्या शर्यतीसाठी अश्वपे्रमींची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : चेतक फेस्टीवलच्या हॉर्स ट्रॅकवर शेवटची स्पर्धा बुधवारी झाली. नाताळची सुट्टी असल्याने सारंगखेडा यात्रेत भाविकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : चेतक फेस्टीवलच्या हॉर्स ट्रॅकवर शेवटची स्पर्धा बुधवारी झाली. नाताळची सुट्टी असल्याने सारंगखेडा यात्रेत भाविकांची व अश्वप्रेमींची प्रचंड गर्दी झाली होती. घोड्यांच्या रेस ट्रॅकच्या आजूबाजूला अनेक अश्वप्रेमींनी उभे राहून स्पर्धेचा आनंद घेतला. रेवाल प्रकारातही ही स्पर्धा घेण्यात आली.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयपालसिंह रावल, प्रणवराज रावल, पृथ्वीराज रावल, दिपेंद्रसिंह सिसोदीया उपस्थित होते. याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांना ७१ हजार, ५१ हजार, ३१ हजार व स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.नाताळाच्या सुट्ट्या असल्याने एकमुखी दत्तांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. रविवारपर्यंत सलग चार दिवस अशीच गर्दी यात्रेत राहील. गेल्या शनिवारी व रविवारी गर्दीने सर्व उच्चांक माडले होते. तशीच गर्दी येणाऱ्या चार दिवसापर्यंत राहील. आज त्याची प्रचिती आली. सुट्टीचा दिवस असल्याने भाविक यात्रेकरून व पर्यटक अश्वप्रेमींनी यात्रा परिसर फुलून गेला होता.बुधवारी झालेल्या अश्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, हरियाणा, दिलञली व महाराष्टÑातील घोडे मालक आपले उमदे घोडे घेवून सहभागी झाले होते. या स्पर्धेतील अश्वांच्या किमती १० ते ५० लाखापर्यंत होत्या, असे घोडे मालकांनी सांगितले. खास स्पर्धेसाठीही अश्व तयार केली जातात व रेवाल या रेस प्रकाराचे त्यांना धडे दिले जातात.या स्पर्धेत २५ अश्वांनी सहभाग घेतला. यात प्रथम फैजाबाद उत्तर प्रदेश येथील सरफराज खान यांचा रूस्तम, द्वितीय फैजाबाद उत्तर प्रदेशचा सुलतान खान यांचा शहंशाह तर तृतीय सुरत येथील इकबाल भाई यांचा तैमुर व उत्तेजनार्थ राजस्थान येथील खुशीराम गुज्जर यांचा नागराज घोडा आला.कार्यक्रमासाठी विवेक वाडीले, विनोद तावडे, संदीप जमादार, महेंदम गिरासे, एकनाथ गिरासे, विलास चौधरी, अजय पाटील, भरत धोबी आदींनी परिश्रम घेतले. परीक्षक म्हणून सतिष पटेल, हॉरज बाबाजी, उमर भाई, अन्सार भाई, बडा बकीला, सरफराज भाई यांनी काम पाहिले.अश्व बाजरात बुधावारी १७ घोड्यांची विक्री झाली. यातून सात लाख १७ हजारांची उलाढाल झाली. आजअखेर ८२७ घोड्यांची विक्री तीन हजार घोड्यांच्या आवकमधून झाली. यातून तीन कोटी ३४ लाख २४ हजारांची उलाढाल झाली. यात्रा रविवारपर्यंत अशीच सुरू राहिली तर गेल्या वर्षीचा उलाढालीचा आकडा पार होऊ शकतो.अश्व स्पर्धेतील विजेत्यांना दिल्या जाणाºया ट्रॉफी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिव्यांग संजय रूपदास मिस्तरी याने नांगर, लाकडी गाडी व नांगरधारी शेतकरी अशा लाकडी कलाकृती तयार करून भेट दिल्या होत्या. तेव्हापासून सारंगखेडा येथील संजय मिस्तरी प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. आपल्या दिव्यांगावर मात करीत संजयने सुतार व्यवसाय सुरू केला असून, त्यातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. दोन्ही पायांनी पोलिओने ग्रस्त असून, यंदाही संजयने उत्तम कुलाकुसरीच्या जोरावर यंदाही अश्व नृत्य स्पर्धा, अश्व रेस, अश्व सौंदर्य स्पर्धेतील विजेत्या घोडे मालकांना सन्मानीत करण्यासाठी ट्रॉफी तयार केल्या. या ट्रॉफी देशातल्या काना कोपºयात जातील यानिमित्ताने संजय बरोबर सारंगखेडा गावाचाही लौकीक होईल.