शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कोकणीपाडय़ात वाघाची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 17:07 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : झुडूपातून बाहेर आलेल्या वाघाने दगडावर उडी मारली, यावेळी  खालच्या बाजूला उभा होतो़  मागे ग्रामस्थ होत़े वाघाच्या डरकाळीने गलीतगात्र झालेले काही पळत सुटले, वनविभागाचे अधिकारी वाघापासून पाच-दहा फूटावर होत़े  पिरमध्येही असा भलामोठा वाघ पाहिला नव्हता़ अजूनही अंगाचा थरकाप होतो हा अनुभव आहे जयसिंग चौरे यांचा़ ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : झुडूपातून बाहेर आलेल्या वाघाने दगडावर उडी मारली, यावेळी  खालच्या बाजूला उभा होतो़  मागे ग्रामस्थ होत़े वाघाच्या डरकाळीने गलीतगात्र झालेले काही पळत सुटले, वनविभागाचे अधिकारी वाघापासून पाच-दहा फूटावर होत़े  पिरमध्येही असा भलामोठा वाघ पाहिला नव्हता़ अजूनही अंगाचा थरकाप होतो हा अनुभव आहे जयसिंग चौरे यांचा़ कोकणीपाडा ता़ नंदुरबार येथे पहिल्यांदा जयसिंग भिवा चौरे यांनी वाघ पाहून वनविभागाला माहिती दिली होती़ घटनेला 10 दिवस उलटले असले कोकणीडा येथील ग्रामस्थांच्या दैनंदिन कामांची घडी मात्र वाघाच्या ‘उडी’ने विस्कटली आह़े     कोकणीपाडा येथील गावाच्या दक्षिण क्षेत्रात  टेकडय़ालगत शेती करून सामाजिक वनीकरणचा गट सांभाळणारे जयसिंग चौरे यांना 21 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वनीकरणातील झुडूपात वाघ दिसला होता़ या माहितीवरून वनविभागाने येथे 22 जुलै रोजी तपास सुरू केला होता़  दरम्यान ‘वाघ’ आल्याची माहिती कोकणीपाडा, निमगाव, निंबी, फुलसरे, जळखे आणि शिरवाडे येथे मिळाल्याने टेकडीखाली शेकडोंचा जमाव जमला़ यादरम्यान सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वन परिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी, मंडळ परिश्रेत्र अधिकारी प्रभाकर नगराळे यांच्यासह वनविभागाचे 10 कर्मचारी आणि 15 ग्रामस्थ टेकडय़ावर चढले, एका झुडपात वन्यप्राणी असल्याची खात्री झाल्यानंतर फटाके फोडण्यास सुरूवात झाली़़ आणि क्षणात पट्टेदार वाघ बाहेर आला़ किमान 200 किलो वजनाचा साधारण 270 सेंटीमीटर लांबी (शेपटीसह) आणि 90 सेंटीमीटर उंच असलेला वाघ डरकाळी फोडत 10 फूट उंचीच्या दगडावर सहज उडी मारूनच  चढला, आणि तेवढय़ाच लांब असलेल्या दुस:या दगडावर उडी टाकून निव्वळ 10 ते 12 सेकंदात टेकडावरून उतरून पश्चिमेकडे निघून गेला़  उडी घेत असताना दगडाखाली लपलेल्या भिमसिंग चौरे यांना पृष्ठभागावर आणि वनमंडळ परिश्रेत्र अधिकारी प्रभाकर नगराळे यांना हातावर वाघाचा पंजा लागला़ प्रत्यक्ष पाच फूटावरून वाघ पहिलेल्या सर्वाची काही काळ भितीने गाळण उडाली तर ग्रामस्थांची भितीने  पळापळ झाली़ ‘वाघ आला वाघ  आला’ अशी ओरड करत काही जण गावाकडे पळाले तर काही जण शेतशिवारात लपल़े घटनेनंतर कोकणीपाडा सावरलं असलं तरीही वाघ पुन्हा दिसेल अशी भिती कायम आह़े  यामुळे दुपारी पाच नंतर दक्षिण दिशेच्या टेकडय़ाच्या परिसरात माणसं जातच नाहीत़ मजूर लवकर कामे आटोपून घरी जातात़ शेतकरी दुपारी शेतीकामे करत असले तरी त्यांची नजर सारखी आजूबाजूला भिरभिरत असत़े पिकात जातानाही सावध पवित्रा घेत शेतकरी मार्गस्थ होत आहेत़ रात्रीच्या वेळी जळखे, फुलसरे, निंबी, कोकणीपाडा या गावांमध्ये नागरिक घराबाहेर झोपणे टाळतात़ शक्यतो माणसं गटानेच बाहेर जात आहेत़ वाघाचं कुतूहल असलं तरी वाघाच्या दहशतीने त्यांच्या मनात घर केलं आह़े वाघाबाबत अनेक उलटसुलट चर्चानाही ऊत आला आह़े यातून ब:याच अंधश्रद्धा डोकावत असल्याचे जाणवल़े आठ दिवस वन विभागाचे कर्मचारी टेकडय़ाखालच्या शेतात मुक्कामी होत़े त्यांनी जागोजागी गस्त करून पाहणी केली आह़े परंतू वाघाचं निशाण दिसून आलेले नाही़ येथून निघाल्यानंतर काळंबा शिवारात वाघाच्या पायांचे ठसे दिसून आले होत़े शिरवाडे व जळखे या दोन गावातही परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी ग्रामस्थांकडून सावधगिरी बाळगली जात आह़े