बोरद येथील हनुमान मंदिरात पोळा सणाचे औचित्य साधून पंचायत समिती सदस्य विजयसिंग राणा, मिलिंद पाटील, दीपक जाधव, कैलास राजपूत, गौतम महिरे, भूषण पाटील, अभयराज राजपूत, साजन शेवाळे, रवीन भिलाव, गौतम भिलाव, विनोद शेवाळे या गावकऱ्यांनी जगाचा पोशिंदा असलेल्या बळी राजाचा गुलाब पुष्प देवून सन्मान केला. आजच्या आधुनिक शेती युगातदेखील काही शेतकरी बांधव शेती मशागती व इतर शेती उपयोगी कामासाठी बैल जोडीचाच उपयोग करतात. तसेच आपल्या पशू धनाची अगदी मनापासून काळजीदेखील घेत असतात. अश्या पशुपालकांचा कुठे तरी सन्मान व्हावा या हेतूने मारुती मंदिरात त्यांचा गुलाब पुष्प देऊन व पेढे भरवून सन्मान करण्यात आला. गावकऱ्यांनी केलेल्या या आगळ्या वेगळ्या सन्मानाने हे शेतकरी भारावले होते.
बोरद येथे बळीराजाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST