शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

बेघरांना घरकुलांची प्रतिक्षा कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 11:17 IST

876 घरकुलांचे काम पुर्ण : लाभार्थी निवड करून वाटप करणार

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना.. 4केंद्र सरकारने आता बेघरांसाठी नवीन योजना आणली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील बेघरांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यात दारिद्रय रेषेखालील, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिकेच्या 876 घरकुलांच्या वाटपाची अद्यापही प्रतिक्षा लागून आहे. घरकुलांचे काम जवळपास पुर्ण झाले असून पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आतच त्यांचे वाटप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालिकेने लाभार्थ्ीची यादी निश्चित करतांना काही निकष ठरविले आहेत.        नंदुरबारातील बेघर लोकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी दीड हजार घरकुलांचा प्रस्ताव पालिकेने पाठविला होता. त्यापैकी 1176 घरकुले बांधकाम प्रस्तावीत होते. प्रत्यक्षात 876 घरकुलांना मंजुरी मिळून त्यासाठी अनुदान दाखल झाले होते. घरकुलांच्या बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाने नंदुरबारातील जिल्हा रुग्णालयासमोरील जागा तसेच धुळे रस्त्यावरील भोणे फाटय़ानजीकची जागा दिली होती. त्या ठिकाणी चार मजली इमारतीत घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. परंतु मध्यंतरी अर्थात दीड वर्षापूर्वी बेघर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अनेकांनी या घरांचा ताबा घेतला होता. त्यामुळे पालिकेला मोठी कसरत करावी लागली होती. पालिकेतर्फे यापूर्वी शहरातील फोटोपास धारक झोपडपट्टीवासीयांना घरकुलांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी तीन ते चार वेळा मुदतवाढही देण्यात आली. परंतू फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा:या कुटूंबाचे घर ज्या भागात असेल ती जागा पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार होती. शिवाय लाभार्थी हिस्सा म्हणून 10 ते 12 हजार रुपये देखील भरावे लागणार होते. त्यामुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.घरकुलांचा ताबादिड वर्षापूर्वी जवळपास 800 जणांनी या घरकुलांचा ताबा घेतला होता. बेघर संघर्ष समितीने आपल्या यादीनुसारच लाभार्थ्ीची निवड करावी अशी मागणी केली होती. परंतु पालिकेने काही नियम व अटी लक्षात घेवून लाभार्थी निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आपल्याला घरकुल मिळणार नाही असा समज करून अनेकांनी या घरकुलांचा ताबा घेतला होता. त्या ठिकाणी अनेक कुटूंबे जवळपास वर्षभर राहिली होती. पालिकेने पोलीस बळाचा वापर करूनही संबधीत कुटूंबे घरातून बाहेर निघाली नव्हती. अखेर जिल्हाधिका:यांनी मध्यस्थी करीत आणि पालिकेने पात्र लाभार्थ्ीनाच घरकुले दिली जातील असे जाहीर केल्यानंतर संबधीत कुटूंबे घरातून बाहेर निघाली आणि ताबा सोडला.काम पुर्णजवळपास एक वर्ष अनेक कुटूंबांनी या घरकुलांचा ताबा घेतलेला होता. त्यामुळे अपुर्ण कामे पुर्ण करता येत नव्हती. अखेर ताबा सोडल्यानंतर ठेकेदाराने तातडीने उर्वरित कामे पुर्ण केली. त्यात नळ फिटींग, किचन, लाईट फिटींग, रंगकाम आणि इतर कामांचा समावेश होता. ते आता पुर्ण करण्यात आले असून लवकरच ठेकेदार ही घरकुले पालिकेच्या ताब्यात देणार असल्याचे सांगण्यात आले.