शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटींमुळे होमगार्ड जवान हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 12:12 IST

जिल्हाधिका:यांना निवेदन : कवायतीला अनुपस्थितीचे कारण देत 50 जवानांची सेवा समाप्त

नंदुरबार : होमगार्डसना कमी मानधन असूनही जास्त काम करावे लागते. अर्थात 40 टक्के कवायत आणि 40 टक्के बंदोबस्त अशा जाचक अटी घालून होमगार्ड जवानांना वेठीस धरले जात असल्याची खंत होमगार्ड जवानांनी जिल्हाधिका:यांकडे व्यक्त केली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात होमगार्ड जवानांनी आपल्या व्यथा व वेदना मांडल्या आहेत. होमगार्ड संघटनेची स्थापना 1946 मध्ये झाली. 71 वर्षापासून हे जवान मानधन तत्वावर काम करतात. होमगार्डच्या राज्याच्या महासमादेशकांनी 1 जानेवारी 2016 पासून नवीन नियम लागू केले. त्यामुळे नंदुरबारसह जिल्ह्यातील 90 टक्के व राज्यातील हजारो होमगार्डस्चे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.नंदुरबार पथकातील 50 होमगार्डला आठ ते 10 दिवसांच्या कालावधीत 40 टक्के परेड व 50 टक्के बंदोबस्ताच्या नावाखाली जाचक अटी लादून कमी केले.               त्यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेळोवेळी बंदोबस्तात हजरदेखील झालेलो आहोत.  मानसेवी असल्याकारणाने आम्हा होमगार्डसना दुय्यम व्यवसाय करावा लागतो. जर आम्ही आजच्या स्थितीत पूर्णवेळ संघटनेकरीता दिला असता तर आमचे कुटुंब उघडय़ावर पडले असते. ही परिस्थिती निर्माण होऊ नये, या कारणाने आम्ही 40 टक्के        कवायत असो किंवा 40 टक्के बंदोबस्त अशा महासमादेशकांच्या जाचक अटी नियमांना बळी            ठरलो.होमगार्ड संघटनेत भरती होताना सांगण्यात येते की, तुम्हाला तुमचे काम करून जो वेळ मिळेल, त्यात देशसेवा म्हणून बंदोबस्त करा. जर एखादा होमगार्ड खाजगी अथवा शासकीय ठिकाणी कामाला असेल तर तो 40 टक्के कवायत व 40 टक्के बंदोबस्त करू शकत नाही. नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षात फक्त एक ते दोन उजळणी शिबिरे, अल्प काळाची अन् अल्प सूचनेने झाली. त्यामुळे शिबिर करता आले नाही.होमगार्डस्ना पोलीस भरतीतील नियमाप्रमाणे 1600 मीटर धावणे, गोळाफेक बंधनकारक आहे. जे होमगार्डस नवीन अथवा जवान आहेत ते मैदानी चाचणी देवू शकतात. परंतु ज्यांची 10 ते 25 वर्षे देशसेवा              झाली आहे व करीत आहेत असे होमगार्ड मैदानी चाचणीत कसे          उत्तीर्ण होणार?, पोलीस ही  शासनाची पगारी सुविधा घेणारी शासनाची बांधिल संघटना आहे. त्यांची तुलना आमच्या 400 रुपये मानधन घेणा:या संघटनेशी कशी करू शकता?महसमादेशकांनी ज्या नियमांनी होमगार्डना कमी केले आहे ते नियम सध्या त्यांच्यावर न लावता त्यांना परत कामावर घ्यावे. यापुढे तीन वर्षानी त्यांच्यावर ते नियम लावावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नियम पालनात झालेली चूक सुधारण्यास संधी मिळेल व होमगार्डलादेखील शाश्वती वाटेल.