शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीबाधितांचे बचत गट पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 13:01 IST

परवड कधी संपणार : बँकांनी कर्ज नाकारल्याने सरकारच्या मानधनावर गुजराण

नंदुरबार : एचआयव्ही-एड्सची लागण झाल्यावर समाजापासून दुरावलेल्या रूग्णांना सन्मानाने जगता यावे यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण संस्था आणि सेवाभावी संस्था यांच्यावतीने बचत गट तयार करण्यात आले होत़े या बचत गटांना बँकांनी कजर्च न दिल्याने बाधितांना अखेर शासनाच्या तुटपुंज्या मानधनावर समाधान मानावे लागत आह़ेजिल्ह्यात साधारण तीन हजार 600 एचआयव्हीबाधित असल्याची नोंद आह़े गैरसमजामुळे बदनाम झालेल्या या एचआयव्ही पॉङिाटिव्ह रूग्णांना त्यांचे आप्तेष्ट, नातलग तसेच समाज आपलसं करत नाहीत़ अशात खचलेल्या रूग्णांना आधार देण्याचे काम काही स्वयंसेवी संस्थांमार्फत 2009 पासून सुरू करण्यात आले होत़े यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने पुढाकार घेतला होता़ यातून तब्बल 9 बचत गटांची निर्मिती करण्यात आली होती़ यात प्रामुख्याने महिलांचा समावेश होता़ ग्रामीण आणि शहरी भागातील या महिला एकमेकांना ओळखत नसल्या तरी या गटाच्या माध्यमातून त्या एकत्र आल्या होत्या़ यासाठी विहान संस्थेच्या आशा माळी यांनी तीन राष्ट्रीयकृत बँकांकडे खाद्यपदार्थ तयार करण्यासह विविध लघुउद्योग उभारण्यासाठी कर्ज पुरवठय़ाची मागणी केली होती़ बँकांनी या कजर्मागणीला वेळोवेळी कागदपत्र आणि नियमांची कात्री लावत प्रकरणे रखडत ठेवली होती़ तब्बल 300 महिलांचा समावेश असलेल्या या 9  गटांना पुढल्या वर्षी कर्ज देणार असे सांगून बँका प्रकरण रेटत होत्या़ एड्स नियंत्रण संस्थेकडून याबाबत पाठपुरावा करूनही दाद दिली जात नव्हती अखेर 2016 पासून बँकांनी कजर्च न दिल्याने सर्व बचत गट बंद करण्यात आले आहेत़ यामुळे एचआयव्ही-एड्सबाधित रूग्ण हे हलाखीचे जीवन जगण्यास बाध्य झाले आहेत़