शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा नगरपालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात आठवेळा महिला राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 12:01 IST

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा नगरपालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात आठवेळा महिला राज आले असून सर्वप्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान एका आदिवासी महिलेला मिळाला आहे. याशिवाय थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचाही पहिला मान आदिवासी महिलेलाच प्राप्त झाला आहे हे विशेष. तळोदा पालिकेची पालिकेची स्थापना 1867 मध्ये झाली आहे. साहजिकच ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा नगरपालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात आठवेळा महिला राज आले असून सर्वप्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान एका आदिवासी महिलेला मिळाला आहे. याशिवाय थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचाही पहिला मान आदिवासी महिलेलाच प्राप्त झाला आहे हे विशेष.तळोदा पालिकेची पालिकेची स्थापना 1867 मध्ये झाली आहे. साहजिकच ही पालिका ब्रिटिशकालीन ओळखली जाते. त्यामुळे या पालिकेने आतापवेतो 28 नगराध्यक्ष दिले आहेत. एक-दोन जण वगळता बहुतेक नगराध्यक्ष इतर मागासवर्गीय समाजातील होते. यात आठ महिलांनीही प्रतिनिधीत्व केले आहे. दोन्ही आदिवासी महिलांचाही यात समावेश आहे. मात्र नागराध्यक्षांच्या कार्यकाळाचा फलक पहिला तर इतिहासात पहिला महिला नगराध्यक्ष होण्याचा मानही आदिवासी महिलेलाच जातो. 1997 ते 2000 मध्ये दीपाली राजेंद्र वळवी ह्या नगराध्यक्षा होत्या. त्यांना तीन वर्षाच्या कालावधी मिळाला होता. त्यानंतर मार्च 2000 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने पक्षीय पातळीवर लढवून येथील बहुजन माळी समाजातील वंदना हेमलाल मगरे यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित होते. दरम्यान, भाजपअंतर्गत गटबाजी उफाळून आल्य नंतर उर्वरित वर्ष-दीड वर्षाच्या कलावधीसाठी भरत माळी यांच्या गटातील ताराबाई जगनसा बागूल ह्या निवडून आल्या होत्या. हेमलता बच्चूसिंग परदेशी यांनीही 2001 मध्ये काही दिवसांसाठी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. 2002 मध्ये पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड झाली. हे पद आदिवासी महिलेकरिता राखीव झाले होते. विमलबाई काशीनाथ सोनवणे ह्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या योजना भरत माळी विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्याच र}ाबाई सुभाष चौधरी ह्या नगराध्यक्षपदी आहेत.