शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील शेतकरी हवालदिल : वीज खंडित केल्याने पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 12:24 IST

महावितरणच्या शहादा उपविभागाकडून कारवाईचे सत्र सुरुच

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : महावितरणच्या शहादा उपविभागाकडून थकबाकी असलेल्या गावांच्या पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करण्यात येत आह़े त्यामुळे तळोद्यातील ग्रामीण भागात आता पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आह़े पिकांना देण्यासाठी तर सोडाच पण जनावरांना पिण्यासाठीही पाणी नसल्याने आता ही जनावरे कोणाच्या दावणीला बांधावी? असा प्रश्न शेतकरी व पशुपालकांकडून विचारण्यात येत आह़े शहादा उपविभागाकडून थकबाकीपोटी तळोदा तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े त्यामुळे पाणी असूनही केवळ वीजेअभावी शेतक:यांना नमते घ्यावे लागत आह़े तळोदा तालुक्यातील एकूण 43 पाणीपुरवठय़ाची जोडणी खंडीत करण्यात आली आह़े ग्रा़पं़कडे मोठी थकबाकीएकूण 1 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी या ग्रामपंचायतींकडे थकीत आह़े यात, प्रतापपूर, धनपूर, रोझवा, खेडले, त:हावद, गव्हाणीपाडा, खुषगव्हाण, लोभाणी, मोदलपाडा, बुधावल, सिव्रे, दलेलपुर, पिंपरपाडा आदी ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आलेला आह़े तालुक्यातील इतरही मोठय़ा गावाच्या पाणीपुरवठय़ाची वीजजोडणी खंडीत करण्यात आली असल्याने शेतक:यांसमोर पिक जगवण्याचा प्रश्न निर्माण झाला आह़े शेतशिवारे पडली ओस.ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती हा असतो़  त्यामुळे साहजिकच पाण्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे शेतशिवारेदेखील आता ओस पडू लागली आहेत़ पाणीच नसल्याने शेतीची सर्व कामे ठप्प पडली आहेत़ तसेच पिकही पाण्याविना करपू लागली असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतक:यांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आह़े पथदिव्यांचेही 5 कोटी थकीतपाणीपुरवठय़ा व्यतीरिक्त पथदिव्यांचीदेखील 5 कोटी 16 लाख रुपयांची थकबाकी तळोदा तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींकडे बाकी आह़े त्यामुळे पथदिव्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आली आह़े पाण्यासोबत आता गावातील वीजही गेली असल्याने शेतक:यांसमोर आता दुहेरी संकट निर्माण झाले आह़े ग्रामपंचायतींनी वीज बिल न भरल्यास गावातील बहुतेक गावे हे अंधारात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आह़े ग्रामपंचायतींमध्ये संभ्रममिळालेल्या माहितीनुसार वास्तविक वीज बिल जिल्हा परिषद भरत असत़े पण गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेने बिल भरलेच नसल्याचे सांगण्यात येत आह़े म्हणून बहुतेक गावांना आता अंधारात राहण्याची वेळ येत आह़े दरम्यान, हे वीज बिल कोण भरणार यावरुन संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे यावरुन दिसून येत आह़े त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने यात हस्तक्षेप करुन यातून मध्यममार्ग काढावा अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े