शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषण, आरोग्य व शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 13:34 IST

नंदुरबार : नुकत्याच करण्यात आलेल्या सव्र्हेक्षणात जिल्ह्यात साडेतीन हजार कुपोषीत बालके आढळून आली आहेत. या बालकांना कुपोषणाच्या सामान्य श्रेणीत आणण्यासाठी धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात 148 ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय 100 टक्के जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्यासाठीही प्रय} सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य ...

नंदुरबार : नुकत्याच करण्यात आलेल्या सव्र्हेक्षणात जिल्ह्यात साडेतीन हजार कुपोषीत बालके आढळून आली आहेत. या बालकांना कुपोषणाच्या सामान्य श्रेणीत आणण्यासाठी धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात 148 ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय 100 टक्के जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्यासाठीही प्रय} सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी ‘लोकमत’ संवाद उपक्रमात बोलतांना दिली.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी रोहयोचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील, मनोज शेलार उपस्थित होते. रणधीर सोमवंशी यांनी यावेळी जिल्हा परिषदेचे गतिमान प्रशासन, पेपरलेस कामकाज, कुपोषण, आरोग्य, शिक्षण यासह इतर विषयांवर चर्चा केली. त्यांनी सांगितले, पावसाळ्यात सातपुडय़ाच्या दुर्गम भागात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यासाठी पावसाळ्याआधीच सर्व आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना सज्ज ठेवण्यात आले आहेत. पुरेसा औषधीसाठा पोहचविण्यात आला आहे. आरोग्य कर्मचारी मुख्यालयी थांबतील यासाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत. सातपुडय़ात कुपोषणाचा प्रश्न या काळात निर्माण होतो. ही बाब लक्षात घेता आरोग्य व महिला आणि बालकल्याण विभागातर्फे कुपोषीत बालकांचे सव्र्हेक्षण करण्यात आले आहे. कुपोषीत बालकांसाठी पहिल्या टप्प्यात धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात 148 ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. ही केंद्र 60 दिवस चालणार आहेत. कुपोषणाच्या सामान्य श्रेणीत आणण्यासाठी या केंद्रांमध्ये बालकांना पुरक पोषण आहार दिला जाणार आहे. तीन ते चार  कुपोषीत बालके आढळलेल्या अंगणवाडी केंद्रात देखील ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. लवकरच इतर तालुक्यात देखील ही केंद्र  लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने नंदुरबार जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून सॅम व मॅम बालकांनाही या केंद्रात सामावून घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे अनेक बालकांना त्याचा फायदा होणार आहे.सर्वच शाळा डिजीटल करणारजिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्यात येणार आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सद्य स्थितीत 900 शाळा डिजीटल झाल्या असून लवकरच 400 शाळा डिजीटल होणार आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना देखील पदस्थापना देण्यात आली आहे. जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. ऑनलाईन बदल्यांच्या वेळी संवर्ग एक व दोनची माहिती भरतांना ज्यांनी चुकीची माहिती भरली असेल त्यांची माहिती घेतली जात आहे.महिला बचत गटजिल्ह्यात 2700 महिला बचत गट स्थापन करण्यात येणार आहेत. त्यांना बँकामार्फत 20 कोटी रुपयांचे भागभांडवल पुरविले जाणार आहे. या माध्यमातून 30 हजार कुटूंबांना जोडले जाणार आहे. पहिले सहा महिने भांडवल उभारल्यानंतर पहिले कर्ज किमान एक लाख रुपयांर्पयत बँकांमार्फत उपलब्ध करून दिले जाईल. याचा फायदा ग्रामिण व दुर्गम भागातील महिलांना स्वावलंभी करणे, या माध्यमातून स्थलांतर रोखण्याचा प्रय} राहणार असल्याचे रणधीर सोमवंशी यांनी सांगितले.रोजगार हमी योजनेंअंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 200 विहिरी पुर्ण करावयाच्या आहेत. गेल्या वर्षीच्या 158 विहिरी पुर्ण करण्यात आल्या आहेत. विहिर लाभार्थीना डीबीटी अंतर्गत निधी दिला जातो. तसेच 17 हजार घरकुलांची कामे देखील सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या रोहयोची 22 हजार कामे सुरू आहेत. 14 वा वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन, ग्रामिण पाणी पुरवठा, कृषी यासह इतर विविध विषयांवरही रणधीर सोमवंशी यांनी यावेळी चर्चा केली.