शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात पावसाने लावली दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/नंदुरबार : जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी पहाटे पावसाने हजेरी लावली़ सुमारे तासभर जिल्ह्याच्या विविध भागात ढगांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/नंदुरबार : जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी पहाटे पावसाने हजेरी लावली़ सुमारे तासभर जिल्ह्याच्या विविध भागात ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे़ दरम्यान रविवारी पहाटेसह दिवसभरात जिल्ह्यात १२५़ १ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस शहादा तालुक्यात झाला आहे़नंदुरबारनंदुरबार शहरासह तालुक्यात रविवारी पहाटे पाऊस सुरु झाला होता़ शनिवारी रात्रीपासूनच आकाशात ढग जमा होवून रिमझिम पाऊस सुरु झाल्याने रात्री उशिरा पाऊस कोसळणार याचा अंदाज बांधला जात होता़ यातच मध्यरात्रीनंतर पावसाची रिपरिप वाढून ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट वाढला होता़ यातून पहाटेच्या सुमारास पाऊस कोसळला़ ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला़ तालुक्यातील अनेक भागात पावसाची प्रतिक्षा होती़ तालुक्यातील काही भागात वीज कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता़ दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला़ पाऊस कोसळून गेल्यानंतर पुन्हा उकाडा जाणवत होता़ रात्री उशिरापर्यंत पुन्हा पावसाची प्रतिक्षा होता़ दिवसभर शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते़शहादारात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शहादा शहरात वादळी वाºयासह पावसाला सुरुवात झाली़ शहरात एक तासात ६६ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाने दिली आहे़ याचदरम्यान आकाशात विजांचा कडकडाट सुरू असल्याने शहादा प्रकाशा रस्त्यावरील १३२ केव्ही मुख्य वीज केंद्रात वीज कोसळल्याने वीज पुरवठा बंद झाला़ यातून शहर अंधकारमय झाले होते़ पहाटे तीन वाजता ही घटना घडली़ अचानक वीज पुरवठा बंद झाल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सबस्टेशनला धाव घेत पहाटे ट्रान्सफार्मरची दुरुस्ती सुरु केली़ परंतू त्यांना यश आले नाही़ कर्मचाºयांनी दुसºया केंद्रातून शहराला वीज देण्याचा प्रयत्न सुरु केला़ सकाळी ९ वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला़ याठिकाणी वीज पडल्यानंतर केंद्रावरील विज अरोधक यंत्रणेमुळे मोठा अनर्थ टळला़ वीज कोसळताना मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते़तालुक्यातील शहादा- ६६, प्रकाशा-६६, कलसाडी-६१, म्हसावद-३५, ब्राह्मणपुरी-२५, तर मोहिदे मंडळात -२० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे़ तालुक्यात असलोद, मंदाणे, वडाळी आणि सारंगखेडा या चार मंडळात शून्य मिलीमीेटर पावसाची नोंद आहे़ दिवसभरात तालुक्याच्या काही भागात पावसाची रिपरिप सुरु होती़ पावसामुळे नाल्यांना पूर आला असून शहादा शहरातील काही भागात पाणी साचल्याचे चित्र सकाळी दिसून आले़ दुपारनंतर हे पाणी जमिनीत मुरले होते़ तालुक्याच्या विविध गावांमध्ये शुक्रवारी वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे़ यात वीजेचे खांब वाकून नुकसान झाले आहे़ गावोगावी ग्रामस्थांच्या मदतीने कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कामांना पूर्णत्त्व देत आहेत़ १२ तासांच्या मेहनतीने कलसाडी व परिसरातील गावांचा वीज पुरवठा शनिवारी सुरु झाला़शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात १२५़१ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे़ यात नंदुरबार-३३, नवापूर-०़१, तळोदा ४, शहादा ६६, अक्कलकुवा १४ तर धडगाव तालुक्यात ८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे़ यात सर्वाधिक पाऊस हा शहादा तालुक्यात पडला असून मुख्यालय आणि सात मंडळ अशी पावसाची नोंद आहे़रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला तालुक्यातील १० मंडळांमध्ये सरासरी २७३ मिलिमीटर पाऊस झाला आहे़ साधारण तीन तास पाऊस सुरु होता़ यादरम्यान पहाटे प्रकाशा रस्त्यावरील १३२ केव्ही वीज केंद्राजवळील शहादा शहराला विजपुरवठा करणाºया ३३ केव्ही वीज केंद्रातील १० मेगावॅट क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवर त्यातील सर्व आॅईल बाहेर फेकले गेले़ सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांना यश आले आहे़नंदुरबारात रात्री १२ नंतर पाऊस झाल्यानंतर विज पुरवठा खंडीत झाला होता़ ग्रामीण हद्दीतील होळ तर्फे हवेली, वाघोदा, पातोंडा व दुधाळे शिवारातील वीज पुरवठा बंद झाला होता़ काही ठिकाणी स्पार्किंग झाल्याने वीज पुरवठा बंद होता़ पहाटेपर्यंत सर्वच ठिकाणी बंद असलेला वीज पुरवठा सात वाजेनंतर पूर्ववत करण्यात आला़पावसाचे आगमन झाल्याने नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीकामांना सुरुवात झाल्याचे दिसून आले़ पेरणीच्या कामांसह शेतीत मिरची रोपांची लागवड करताना महिला दिसून आल्या़वादळामुळे वाण्याविहिर दोन दिवसांपासून अंधारातलोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : अक्कलकुवा तालुक्यात वाण्याविहीर सह परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे झाडे तूटून वीज वाहिन्यांवर कोसळली होती़ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या प्रकारानंतर ४८ तास उलटूनही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही़ यामुळे नागरिक हैराण झाले आहेत़शुक्रवारी सायंकाळी वाण्याविहिर परिसरात जोरदार वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली होती़ यामुळे गावातील काही भागात झाडे आणि खांब कोसळले आहेत़ झाडांच्या फांद्या थेट वीज वाहिन्यांवर कोसळून वीज पुरवठा बंद पडला आहे़ दरम्यान वीज वितरण कंपनीच्या अक्कलकुवा येथील उपविभागात कर्मचाºयांची संख्या आणि साहित्य अपुरे असल्याने दुरुस्तीचे काम पूर्णक्षमतेने झालेले नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागातही वादळी वाºयामुळे नुकसान झाल्याची माहिती असून वीज वाहिन्या तुटल्या आहेत़सलग दोन दिवसांपासून वाण्याविहिर आणि परिसरातील गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत़