शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने नवापूरला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : पहाटे चार ते सहा वाजेच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने नवापूर तालुक्यास धुवून काढले. तालुक्यातील बोकळझर येथे रंगावली नदीचे पाणी घरात घुसल्याची व शहरातील मेमण गल्ली परीसरात नाल्याचे पाणी घुसल्याने काही घरांचे नुकसान झाल्याची घटना घडली. नवापूर तालुक्यात पहाटे जोरदार पाऊस बरसला. नदी-नाले दुथडी वाहून निघाले. अनेक ठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : पहाटे चार ते सहा वाजेच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने नवापूर तालुक्यास धुवून काढले. तालुक्यातील बोकळझर येथे रंगावली नदीचे पाणी घरात घुसल्याची व शहरातील मेमण गल्ली परीसरात नाल्याचे पाणी घुसल्याने काही घरांचे नुकसान झाल्याची घटना घडली. नवापूर तालुक्यात पहाटे जोरदार पाऊस बरसला. नदी-नाले दुथडी वाहून निघाले. अनेक ठिकाणी चार ते पाच तास फरशीवरुन वाहणा:या पाण्यामुळे वाहतुकीचा ग्रामीण भागात खोळंबा झाला होता. महसूल मंडळ निहाय झालेला पाऊस असा- नवापूर 40 मिलीमीटर, चिंचपाडा 162 मिलीमीटर, नवागाव 36 मिलीमीटर, विसरवाडी 47 मिलीमीटर, खांडबारा 26 मिलीमीटर असे  एकूण 311 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक पाऊस चिंचपाडा परिसरात झाला.धनराट व बोकळझर गावाच्या दरम्यान रंगावली नदीवर पूल वजा बंधारा बांधण्यात आला आहे. बंधा:याच्या पाटय़ा काढण्यात आल्याने तेथे पुराच्या पाण्यासह वाहून आलेला कचरा अडकून पडल्याने नदीचे पाणी लगतच्या बोकळझर गावातील तीन घरांमधे घुसले.सरपंच राहूल गावीत यांनी महसूल प्रशासनास घटनेची माहिती दिल्याने प्रभारी तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, मंडळ अधिकारी दिलीप कुलकर्णी, किशोर पेटकर, एस.टी. यादव यांनी भेट देऊन पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे सहायक अभियंता  संजय पाडवी व जेरा वळवी यांनी जेसीबी यंत्र लावून बंधा:याच्या पाटय़ा काढल्यानंतर पुराचे अडकलेले पाणी वाहून निघाले. नदी किनारी असलेल्या भामरमाळ येथील एका किराणा दुकानाचा कोपरा वाहून निघाला.मरीमाता मंदीर जवळच्या के.टी. वेअर च्या पाटय़ा काढल्याच्या ठिकाणी नदीतून वाहून येणारा कचरा अडकल्याने के.टी वेअर लगत गत पावसाळ्यात पडलेल्या खड्डय़ातून पुराचे पाणी वाहून निघाल्याने तेथे केलेला भराव पुन्हा वाहून गेला. तेथे पडलेले भगदाड पूर्ववत करण्यासाठी 49 लाख रुपये मंजूर असूनही शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचार संहिता आड आल्याने ते काम पावसाळ्यापूर्वी होवू शकले नाही. शहरातील गरीब वस्तीत असलेल्या भूमिगत गटारी तुंबल्याने आरोग्य विभागाचे कामगार दिवसभर गटारी व नाल्यामध्ये अडकलेला कचरा वेगळा करण्यात गर्क होते. एकाच दिवसात झालेल्या पावसाने मात्र प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा करुन टाकले एवढे मात्र नक्की.