या पार्श्वभूमीवर ८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व संवर्गातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सभा घेतली व त्या सभेत अंतिम निर्णायक विजयी लढा देण्याचा निर्णय घेऊन २३ ऑगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला. महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे, राजू भाई, वाय.पी. गिरी, विशाल मोघे यांनी जिल्ह्यात दौरे करून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे.
प्रशासनाने वेळकाढू व चालढकलपणा न करता त्यांना त्यांच्या हक्काचा प्रत्यक्ष लाभ देऊन न्याय द्यावा व कर्मचाऱ्यांना नाइलाजास्तव आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन डॉ. कांतिलाल टाटिया यांनी केले.
कालबद्ध पदोन्नती व पदोन्नतीच्या अंतिम निर्णायक लढ्यात मलेरिया कर्मचारीदेखील लढा देतील, असे आरोग्य कर्मचारी महासंघाचे चिटणीस सतीश जाधव, निखिल तुपे यांनी सांगितले.