शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
3
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
4
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
5
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
6
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
7
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
8
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
9
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
10
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
11
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
12
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
13
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
14
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
15
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
16
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
17
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
18
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
19
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
20
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....

विद्याथ्र्याच्या पोषक आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रत्येक शाळा, महाविद्यालयात आरोग्य समिती स्थापन करून उपहारगृहात अथवा घरून आणल्या जाणा:या डब्यात पोषक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रत्येक शाळा, महाविद्यालयात आरोग्य समिती स्थापन करून उपहारगृहात अथवा घरून आणल्या जाणा:या डब्यात पोषक आहार कसा असावा याबाबत अन्न व औषध प्रशासनाने नियमावली तयार केली असून, त्याची जुलै ते डिसेंबर 2019 र्पयत अंमलबजावणी होणार आह़े त्यासाठी शाळा, महाविद्यालयात जागरूकता निर्माण करून जंक फूडला हद्दपार करीत डब्याचा 80 टक्के भाग हरीत  पदार्थाचा असावा, अशी सूचना केली आह़ेअन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ़पल्लवी दराडे यांनी संपूर्ण वर्षभराचा पोषण आहार कार्यक्रम शाळा व महाविद्यालयांना कळविला आह़े राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना मान्य केल्या आहेत़ त्यानुसार प्रत्येक शाळेत आरोग्य समिती असेल ज्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालक असतील़ ज्याद्वारे शाळा, महाविद्यालयातील उपहारगृहामध्ये दिले जाणारे पदार्थ, भोजन आरोग्यदायी होईल याची काळजी घेतली जाईल़ जंक फूडचा प्रचार आणि प्रसार होणार नाही याची काळजी शाळांनी घ्यायची आह़े तसेच जिथे मुले घरून डबा आणतात त्या शाळांनी पालकांना विश्वासात घेऊन पोषक आहाराचा समावेश केला पाहिज़े आरोग्य सदृढ रहावे यासाठी हिरव्या पालेभाज्य व कडधान्यावर भर देणे आवश्यक आह़े 

जंक फूड हे आपल्या सगळ्यांच्या जीवनशैलीचा भाग होत आह़े त्याचा मुलांच्या आरेाग्यावर मोठा दुष्परिणाम होत आह़े त्यामुळे घरून आणला जाणारा डबा व कँटिनमधील पदार्थामध्ये मोठे बदल सुचविण्यात आले आहेत़ कँटिनच्या भोजनात जंकफूड नाहीसे करण्याचे आदेश दिले आहेत़ पोषक आहार नसल्यामुळे मुले एचएफएसएस अर्थात हाय फॅट शुगर अँड सॉल्ट म्हणजेच ज्यामध्ये मेद, मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त आहे, असे पदार्थ खातात़आकर्षक जाहिरातींमुळे कमी किमतीतील पॅकिंगमधील पदार्थाची सवय लागत़े ज्यामुळे घरी बनविलेले पदार्थ मुले खात नाहीत़ त्याचे दुष्परिणाम म्हणून आवश्यक काबरेदके व प्रथिने मुलांना मिळत नाहीत़ दरम्यान, शाळा, महाविद्यालयांना आपल्या संस्थेत दिल्या जाणा:या अन्न पदार्थाच्या मेनुची माहिती ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 या कालावधीत संबंधित अन्न सुरक्षा अधिका:यांना द्यावी लागेल़ तसेच सहाय्यक आयुक्त व आरोग्य समन्वयक शाळांना भेट देवून आढावा घेतील़

ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कार्यशाळाशाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य, आरोग्य समिती, विद्यार्थी, पालक यांना पोषक आहाराचे महत्व सांगण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन अन्न व प्रशासन विभाग करणार आह़े त्याचा अहवाल डिसेंबरमध्ये पाठवून शाळा, महाविद्यालयात दिल्या जाणा:या अन्न पदार्थाच्या मेनूमध्ये बदल केला जाणार आह़े