शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

तळोदा येथे 60 निराधार वृद्धांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : दिवाळीनिमित्त तळोदा येथिल सहयोग सोशल ग्रुप व नैवेद्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील निराधार वृद्धांसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : दिवाळीनिमित्त तळोदा येथिल सहयोग सोशल ग्रुप व नैवेद्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील निराधार वृद्धांसाठी आरोग्य तपासणी करण्यात आली. यात एकुण  60 जणांची तसापणी करीत त्यांच्यावर औषधोपचारह करण्यात आली. ज्यांच्या नशिबी दिवसातून एकवेळचे जेवण सुद्धा नाही अश्या निराधार, गरजू व अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जणा:या तळोद्यातील 70 पेक्षा अधिक वृद्धांची नैवेद्य फाउंडेशनतर्फे एकवेळ जेवणाची व्यवस्था केली. मात्र त्यांची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता भविष्यात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो, ही बाब लक्षात घेत सहयोग सोशल ग्रुपने या वृद्धांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिवाळीचे औचित्य साधत एक दिवसीय आरोग्य शिबीर राबविले. यावेळी 44 महिला व 16 पुरुष अश्या एकूण 60 वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व चाचण्याही घेण्यात आल्या. त्यांच्यावर आजारानुसार मोफत औषधोपचार सुदधा करण्यात आला. यावेळी सहयोग सोशल ग्रुपचे सदस्य अॅड. अल्पेश जैन, डॉ. संदिप जैन, डॉ. योगेश बडगुजर, डॉ. सुनील लोखंडे, डॉ. महेश मोरे, डॉ. लक्ष्मीकांत चौधरी, सम्राट महाजन, यादव जिरे आदी उपस्थित होते. यावेळी गणेश पाटील, सोहेल मंसुरी, संदीप पाडवी, गणेश चव्हाण, प्रमोद मिस्त्री, नितीन पाटील, तेजस सूर्यवंशी, तुकाराम पावरा, गणेश कडोशिया, दीपक गुरव, जितेंद्र नायदे, शीतल पाटील, राहुल पाटील, रवी चव्हाण आदींनी योगदान दिले.

शिबीरासाठी उपस्थित राहिलेले वृद्ध हे सर्व निराधार असुन त्यांना सर्वस्वी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना मोफत चादरी देखील वाटप करण्यात आले. यासाठी स्वप्नील  परदेशी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी निराधारांना मायेची उब देण्याचा प्रय} केला. चादरी वाटप उपक्रमामुळे या निराधारांना यंदाच्या हिवाळ्यापासून स्वत:चा बचाव करता येणार आहे.