नंदुरबार : काहीही कारण नसतांना रागाच्या भरात एकाने महिलेवर विळ्याने वार करून तिचा एक बोट छाटल्याची घटना कोठली, ता.नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किसन तुकाराम कोकणी, रा.कोठली असे संशयीताचे नाव आहे. ५ मार्च रोजी गयणुबाई सकू कोकणी (५०) रा.कोठली ही महिला त्यांच्या ओट्यावर बसलेल्या असतांना किसन तुकाराम कोकणी अचानक तिथे आला. काही कळण्याच्या आत त्याने महिलेवर विळ्याने वार केला. तो वार वाचविण्याच्या प्रयत्नात तिच्या हाताचे एक बोट छाटले गले तर दुसऱ्या बोटाला ईजा झाली. याशिवाय डोक्यावर, छातीवर देखील वार केले. त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. महिलेला गंभीर स्थितीत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.गयणूबाई सकू कोकणी यांच्या फिर्यादीवरून किसन तुकाराम कोकणी यांच्याविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार वळवी करीत आहे.
नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे विळ्याने वार करून महिलेचा बोट छाटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 11:39 IST