शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारकर साथीच्या आजारांनी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:23 IST

नंदुरबार :  वातावरणातील वारंवारचा बदल, डास व मच्छरांचा प्रादुर्भाव आणि पाणी टंचाईमुळे मिळेल त्या ठिकाणाहून उपलब्ध होणारे पाणी यामुळे ...

नंदुरबार :  वातावरणातील वारंवारचा बदल, डास व मच्छरांचा प्रादुर्भाव आणि पाणी टंचाईमुळे मिळेल त्या ठिकाणाहून उपलब्ध होणारे पाणी यामुळे साथीच्या आजारांची आणि हिवतापच्या रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. तातडीने सव्र्हेक्षण करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. थंडीची कमी अधिक तीव्रता, कधी ढगाळ वातावरण असे वातावरण गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. त्यामुळे साथरोगाचे रुग्ण जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहेत. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्वच 74 मलेरिया केंद्रांवर अशा रुग्णांसाठी उपचार सुरू केले आहेत. शासकीय जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या मलेरिया, टायफाईड, जहरी मलेरिया या रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉक्टरांनीही त्याला दुजोरा दिला आहे. नंदुरबार शहरातील दाटीवाटीच्या वस्तीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. घन कचरा व्यवस्थापन करणा:या ठेकेदाराने महिनाभरापूर्वी काही भागात फवारणी सुरू केली होती. परंतु नंतर अध्र्यातूनच ती बंद करण्यात आली.ग्रामिण भागात तर कुणीच वाली नसल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने प्रभावी उपाययोजना केल्याचे म्हटले असले तरी ग्रामपंचायत स्तरावरच त्या त्या ग्रामपंचायतींना उपाययोजना कराव्या लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात 58 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 290 उपकेंद्रे, 13 ग्रामिण  रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालये व इतर संस्थांद्वारे हिवताप नियंत्रणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. रुग्णांना वेळीच क्लोरोक्विनचा औषधोपचार मिळावा, रक्त नमुना वेळीच घेता यावा या हेतूने जिल्ह्यात एक हजार 801 आशा कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून औषधोपचार केला जावून  दैनंदिन गृहभेटीदरम्यान पाणी साठवणूकची ठिकाणे तपासली जात असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.