शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात तापमानापेक्षा आद्रतेने हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 12:51 IST

33 टक्के आद्रतेची नोंद : रात्री उशिरार्पयत जाणवतात उष्ण लहरी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असली तरी वातावरणात वाढत असलेल्या आद्रतेमुळे नागरिक सर्वाधिक त्रस्त झाले आहेत़ दिवसेंदिवस आद्रतेत वाढ होत असून शनिवारी नंदुरबारात 43 अंश सेल्सिअस तापमान तर तब्बल 33 टक्के आद्रतेची नोंद करण्यात आली आह़ेमध्य प्रदेश, राजस्थान येथून मोठय़ा प्रमाणात उष्ण लहरी येत असून त्याचा वेग ताशी 22 ते 25 प्रती किलोमीटर असल्याचे ‘स्कायमेट’ या हवामान संस्थेकडून नोंदविण्यात आले आह़े त्यामुळे साहजिकच नंदुरबारात तसेच नंदुरबारातील सिमावर्ती भागात उष्णतेची लाट दिसून येत आह़े गुरुवार व शुक्रवारी 42 ते 44 अंशादरम्यान तापमानाची नोंद करण्यात आली आह़े दिवसागणिक तापमानात वाढ होत आह़े त्यासोबत आद्रताही नवनवीन उच्चांक गाढत आह़े शनिवारी दिवसभर कमी दाबाचा वीजपुरवठाऐन उन्हाळ्याचे दिवस असताना शनिवारी तांत्रिक कारणामुळे महावितरणकडून कमी दाबाचा वीजपुरवठा पुरविण्यात येत होता़ त्यामुळे पंख्यासोबतच कुलर्ससुध्दा पूर्ण क्षमतेने चालत नव्हत़े तांत्रिक कारणांमुळे नंदुरबार शहर, पातोंडा, एकता नगर, खांडबारा, टोकरतलाव, पळाशी, कोठली, करणखेडा, चौपाळे, खोंडामळी, कोपर्ली, शिंदे, वैदाने, एकता नगर, विसरवाडी, नवापूर, खातगाव, विसरवाडी, बिलबारा, रायपूर आदी परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता़ तसेच दिवसभर या ठिकाणीचा वीजपुरवठा कमी दाबाचा होता़ त्यामुळे साहजिकच नागरिकांचे यातून मोठे हाल झाल़े वाढत्या आद्रतेने आधीच घामोघाम झालेल्या नागरिकांना शनिवारी दिवसभर उकाडय़ाचा सामना करावा लागला़ रात्रीसुध्दा वीजपुरवठा खंडित झाला नसला तरी अत्यंत कमी दाबाच्या वीजपुरवठय़ाने नागरिकांची गैरसोय झाली़ यंदाच्या मोसमात तापमानापेक्षा आद्रतेने नागरिक सर्वाधिक हैराण झाले होत़े दुपारच्या वेळी तसेच रात्रीसुध्दा उष्णलहरी जाणवत असतात़ मध्यरात्री काही प्रमाणात शित लहरी असल्याने नागरिक घरात झोपण्यापेक्षा घराच्या छतावर झोपण्यास अधिक पसंती देत आहेत़ तसेच उकाडय़ापासून दिलासा मिळावा यासाठी उपाय योजना करीत आहेत़