शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

‘लोकमत’वर वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाचकांच्या स्नेहरूपी वर्षावात ‘लोकमत’च्या नंदुरबार जिल्हा कार्यालयाचा 21 वा वर्धापनदिन  थाटात साजरा करण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाचकांच्या स्नेहरूपी वर्षावात ‘लोकमत’च्या नंदुरबार जिल्हा कार्यालयाचा 21 वा वर्धापनदिन  थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त शनिवार 13 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कन्यादान मंगल कार्यालयात स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ प्रसंगी  नंदुरबार: काल, आज, उद्या या विशेष पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल़े   ‘लोकमत’वर प्रेम करणा:या स्नेहीजनांनी कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणावर उपस्थिती दिली. पुरवणी प्रकाशनाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ़ हीना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, पोलीस अधिक्षक संजय पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, माजी मंत्री अॅड़पद्माकर वळवी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार  गावीत,  ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी,  सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी उपस्थित होत़े प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वालन  करण्यात आल़े यानंतर ‘लोकमत’ परिवाराच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आल़े 21 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित नंदुरबार: काल, आज, उद्या पुरवणीचे प्रकाशन  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल़े      मनोगत व्यक्त करताना खासदार डॉ़ हीना गावीत यांनी ‘लोकमत’ने लोकांचे मत मांडण्याचे काम जिल्ह्यात केले आह़े वृत्रपत्र  हे जबाबदार माध्यम आह़े यातून वृत्तपत्र माध्यमाची विश्वासार्हता टिकून आह़े 21 वर्षापासून ‘लोकमत’ने नंदुरबार जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टीकोनाला समोर ठेवून ‘लोकमत’ने पत्रकारिता केली आह़े ही योग्य बाब आह़े देशातील 115 जिल्ह्यांची आकांक्षित म्हणून निवड झाली आह़े त्यात नंदुरबार जिल्ह्याची निवड झाली आह़े निवड झाल्यापासून नंदुरबार जिल्ह्याने त्यात भरारी घेत वरचे स्थान मिळाले आहे हे प्रशासनाचे यश आह़े ‘लोकमत’ परिवाराने यात भरीव योगदान दिले आह़े दिल्लीत ‘लोकमत’ आवृत्ती सुरु झाल्याने महाराष्ट्राच्या खासदारांचा आवाज जनतेर्पयत पोहोचू लागला आह़े कुपोषणनिमरुलनासाठी ‘लोकमत’ने केलेले कार्यही मोठे आह़े आमदार उदेसिंग पाडवी यांनी पुरवणीतील लेखांद्वारे ‘लोकमत’ने जिल्हा विकासाची रचना केली आह़े आकांक्षित जिल्हा म्हणून निवड झालेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत़ यासाठी माध्यमांनी भूमिका घेतल्यास विकासात्मक दृष्टीकोनातून कामकाज होऊ शकत़े नंदुरबार जिल्ह्याची  अत्यंत दज्रेदार अशा या पुरवणीतून जिल्ह्यातील चांगल्या आणि विकसनशील पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आह़े आमदार शिरीष चौधरी यांनी ‘लोकमत’ हा सर्वसामान्य माणसाचा आवाज असतो़ ‘लोकमत’च्या दज्रेदार लिखाणातून मार्गदर्शन होत असल्याचे सांगितल़े   जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी ‘रिव्हर्स मायग्रेशन’ ही संकल्पना मांडून जिल्ह्यातून शिकून गेलेल्या उच्चशिक्षित युवकांनी येथे येऊन योगदान देण्याचे आवाहन केल़े मागासलेपणाचा शिक्का पुसून काढण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्यासाठी युवकांनी योगदान देऊन संकल्पना राबवल्यास त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल़े   प्रास्ताविकात निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी नंदुरबार: काल आज, उद्या या पुरवणीची भूमिका विषद करत ‘लोकमत’च्या वाटचालीची माहिती दिली़ कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा भरारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला़ त्यात जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, गुजरात प्रदेश भाजप पदाधिकारी महेंद्रभाई पटेल, नंदुरबारातील डॉ़ राजेश वळवी, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जेलसिंग पावरा, निवृत्त उपअभियंता शरदभाई पाटील, शहाद्याचे बालरोग तज्ञ डॉ़ प्रदीप पटेल यांचा समावेश होता़ त्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आल़े  यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आल़े कार्यक्रमास नवापुरच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील, नंदुरबारचे उपनगराध्यक्ष परवेज खान, शहाद्याच्या उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपअधिक्षक रमेश पवार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ़ शशिकांत वाणी, ज्येष्ठ कृषी तज्ञ गजानन डांगे, जागतिक सौंदर्य स्पर्धेच्या विजेत्या मोनिका मिणा, धुळ्याच्या वेतन अधिक्षक मिनाक्षी गिरी, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी,  माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ पितांबर सरोदे, डॉ़ विश्वास पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिपक गवते, जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ़अभिजीत मोरे, चित्रपट कलावंत कल्पेश पाटील, दिग्दर्शक भूषण चौधरी, पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा़ मकरंद पाटील, शहादा बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, अक्कलकुव्याच उपसभापती इंद्रपालसिंह राणा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत़े