शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

तळोदा पं.स.चे हातपंप दुरूस्तीपथक चार महिन्यापासून वाहनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : येथील पंचायत समितीचे हातपंप दुरूस्ती पथक गेल्या चार महिन्यांपासून वाहनविना आहे. ग्रामपंचायतींना हातपंप दुरूस्तीसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील पंचायत समितीचे हातपंप दुरूस्ती पथक गेल्या चार महिन्यांपासून वाहनविना आहे. ग्रामपंचायतींना हातपंप दुरूस्तीसाठी खाजगी वाहनांचा आधार घेतांना प्रचंड हाल होत असतात. यामुळे ग्रामीण भागातील साधारण ९० हातपंप नादुरूस्त पडल्याची सूत्रांची माहिती आहे. या नादुरूस्त हातपंपामुळे त्या भागात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जिल्हा परिषद प्रशासनाने याप्रकरणी तातडीने दखल घेऊन वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी साधारण ६५० हातपंप बसवून दिले आहेत. या हातपंपाच्या दुरूस्तीसाठी पंचायत समितीला स्वतंत्र दुरूस्ती पथकदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. तथापि हे दुरूस्ती पथक गेल्या चार महिन्यापासून वाहनाविना आहे. कारण येथील वाहनाच्या परवाना नूतनीकरणासाठी आरटीओकडे दरवर्षी पाठविण्यात येतो. त्या वेळी आरटीओनी वाहन वापरण्या योग्य नसल्यामुळे वाहनच जमा करून घेतले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना आपल्या गावातील हातपंप नादुरूस्त झाले तर खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत असतो. यासाठी त्यांना मोठी रक्कमदेखील मोजावी लागत असते. त्याचबरोबर दुरूस्ती पथकाची एक हजार रूपयांची फीदेखील भरावी लागते. साहजिकच नाहक आर्थिक भुर्दंड भरावा लागत असल्याची ग्रामपंचायतींच्या प्रशासनाची व्यथा आहे. या आर्थिक फटक्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमधील साधारण ९० हातपंप दुरूस्तीअभावी तसेच धुळखात पडले असल्याचेही म्हटले जात आहे. आहेत तेवढ्या हातपंपावरच काम भागविले जात असल्याने त्या भागातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.वास्तविक येथील पंचायत समितीच्या ग्रामीण पुरवठा विभागाने नवीन वाहनासाठी गेल्या तीन महिन्यापासून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. शिवाय संबंधीतांकडून पाठपुरावादेखील केला जात आहे. तरीही आजतागायत पंचायत समितीला वाहन उपलब्ध झालेले नाही. इकडे वाहनासाठी ग्रामपंचायतीचे प्रचंड हाल होत आहे. स्वत: हमाली करत साहित्याची व कर्मचाऱ्यांची ने आण करावी लागत आहे. निदान जिल्हा परिषदेने नवीन वाहनाऐवजी करारावर तरी दुसरे वाहन उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे. मात्र त्याबाबतही कार्यवाही केली जात नसल्याने जिल्हा परिषदेच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांकडून व्यक्त केली जात आहे.याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सद्या वाढणाºया प्रचंड तापमानाची वस्तुस्थिती लक्षात घेऊन संबंधितांना वाहन उपलब्ध करण्यासाठी कडक तंबी द्यावी, अशी ग्रामीण जनतेची मागणी आहे.पंचायत समितीला हातपंप दुरूस्तीसाठी दिलेल्या दुरूस्ती पथकात तीन कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यात तांत्रिकी सहाय्यक, वेल्डर, फीटर व वाहनचालक अशी तीन कर्मचारी कार्यरत असतात. तथापि सद्या एकाच कर्मचाºयावर कामाचा भार पडत आहे. कारण नादुरूस्त हातपंप दुरूस्ती वा बसविण्यासाठी तांत्रिकी सहाय्यक फीटर हे दोन कर्मचारी महत्वाची असतात. परंतु या पथकातील महत्त्वाचा सहाय्यक गेल्या मार्च महिन्यात वयोनियतनमानामुळे सेवानिवृत्त झाला आहे. त्यामुळे हातपंप दुरूस्तीची कामे एकाच कर्मचाºयाला करावी लागत आहे. एवढेच नव्हे ग्रामपंचायतींनी हातपंप दुरूस्तीसाठी दिलेल्या एक हजार रूपयांचे चलन संबंधीत बँकेत भरणे, रजिस्टरमध्ये दुरूस्तीची नोंद करणे, साहित्यांची दुरूस्ती करणे याशिवाय दुरूस्तीची कामे करणे, अशी कामेही त्या कर्मचाºयाला सांभाळावे लागत असते. वास्तविक नवीन तांत्रिक सहाय्यकाच्या नियुक्तीबाबतही यंत्रणेने प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविला आहे. परंतु याबाबत गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप आहे. तालुक्यातील हातपंपाची संख्या लक्षात घेऊन हे पद तत्काळ भरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.