शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात मंजूर केलेल्या निम्मे शेततळ्यांची कामे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरडवाहू क्षेत्राचा विकास होऊन जलसंधारण व्हावे या उद्देशाने जिल्ह्यात कृषी विभाग राबवत असलेल्या मागेल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरडवाहू क्षेत्राचा विकास होऊन जलसंधारण व्हावे या उद्देशाने जिल्ह्यात कृषी विभाग राबवत असलेल्या मागेल त्याला शेततळे योजना रखडली आह़े  वर्षभरात 1 हजार 600 शेततळे उभारणीचे आदेश काढूनही निम्मे शेततळे अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आह़े   राज्य शासनाने 2016 पासून मागेल त्याला शेततळे ही योजना अंमलात आणली होती़ सर्वसाधारण वर्गातील शेतक:यांसाठी किमान दीड एकर तर आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शेतक:यांच्या साधारण 1 एकर क्षेत्रासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना होती़ 2018-19 या वर्षात कोरडवाहू शेतीत पाणी प्रयोग करुन जमिनीला संजीवनी देण्यासाठी 4 हजार 518 शेतक:यांनी अर्ज केले होत़े यातील 3 हजार 438 शेतक:यांना पात्र ठरवण्यात येऊन त्यातील योग्य, अयोग्य, छाननी आणि तपासणीचे कामकाज करुन शेवटी 1 हजार 696 शेतक:यांना शेततळ्याचे काम सुरु करण्याचे आदेश काढण्यात आले होत़े यासाठी शासनाने 2 कोटी 14 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता़ हा निधी शेतक:यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु आह़े कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार  शासनाकडून थेट बँकेत शेतक:यांनी केलेल्या कामाच्या आधारे पैसे वर्ग करण्यात येत आहेत़ तरीही गेल्या चार वर्षात नंदुरबार जिल्ह्यासाठी 4 कोटी 56 लाख 11 हजार रुपयांचा खर्च केला आह़े एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खर्च करुन उभारलेली 2 हजारच्यावर शेततळी गेली कुठे असाही प्रश्न आह़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागात चालू वर्षात केवळ 12 ठिकाणी शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत़ परंतू या तालुक्यातून शेकडोंच्या संख्येने अर्ज करणा:या व कार्यारंभ आदेश घेणा:या शेतक:यांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आह़े आकारमानानुसार किमान एका शेततळ्यासाठी 22 हजार 110 ते 50 हजार रुपयांचे अनुदान पात्र शेतक:यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात येत़े यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातील शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज भरुन सेवाशुल्कही दिले होत़े यातील किती शेतक:यांचे शेततळे पूर्ण होऊन जलसंधारण होत आहे याबाबत जिल्ह्यात माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही़ 2018-19 या वर्षात कृषी विभागाने काढलेल्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यासाठी 1 हजार 500 शेततळ्यांचा लक्षांक देण्यात आला होता़ यासाठी 1 कोटी 27 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ यातून कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या साडेतीन हजार अर्जापैकी 1 हजार 696 लाभार्थीना कामे सुरु करण्याचे आदेश काढण्यात आले होत़े यातील 1 हजार 652 जणांची आखणी कृषी विभागाने करुन दिली होती़ तर 986 शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाचा आह़े परंतू उर्वरित 666 शेततळ्यांचे काय, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े 1 हजार 696 पैकी 44 पात्र शेतक:यांच्या अर्जाबाबतही योग्य ती कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आह़़े 2016-17 या वर्षात 1 हजार शेततळ्यांचा लक्षांक देण्यात आला होता़ यासाठी 3 हजार 382 अर्ज आले होत़े यातील 1 हजार 592 शेतकरी पात्र ठरुन 1 हजार 565 जणांना कार्यारंभ आदेश दिले होत़े पैकी 436 शेततळे पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आह़े 15 बाय 15- 3 घनमीटर ते 30 बाय 30 - 3 घनमीटर क्षेत्रात निर्माण होणा:या शेततळ्यासाठी 225 ते 900 चौरस मीटर क्षेत्र वापरले जात़े शेतक:यांनी कार्यारंभ आदेश दिल्यानंतर खोदकाम केले होत़े योजेनत दारिद्रय़रेषेखालील शेतक:यांचा समावेश करताना आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या कुटूंबियांना प्राधान्य देण्याचे शासनाचे आदेश होत़े तसेच शासनाने नव्याने काढलेल्या आदेशानुसार पाच वर्षे दुष्काळ असलेल्या क्षेत्रात 50 पैसे पैसेवारी असलेल्या किमान एकातरी गावाचा या उपक्रमात सहभाग करुन घेण्याचे सक्तीचे केले होत़े  शेततळ्यांसाठी जिल्हास्तरावर आढावा समितीची स्थापना केली आह़े परंतू याबाबत आढावा घेतल्याची माहिती नाही़