लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : महिलांनी लहान-मोठे उद्योग उभे करून कुटूंब, समाज आणि देशाच्या विकासात हातभार लावावा असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी कौशल्य विकास कार्यक्रमात बोलतांना केले. यावेळी महिलांसाठी असलेल्या योजना, कायदे आणि उद्योगाच्या संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले.उमेद व राज्य ग्रामिण जीवन्नोती अभियानाअंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रमाचे जिल्हा परिषदेत आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जि.प.अध्यक्षा रजनी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अभियान कक्षाचे यशवंत ठाकुर, ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक संजय धामणकर, पोलीस उपअधीक्षक सिताराम गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारिका बारी, विजया वाघ, मिना पाटील, वैशाली नाईक, गिरीश पाटील अमित पिंजारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना रजनी नाईक यांनी महिलांना स्वयंरोजगाराकडे वळण्याचे आवाहन केले. लहान, मोठे उद्योग करून व शासनाच्या विविध योजनांबा लाभ घेवून आपला उद्योग व स्वयंरोजगार पुढे न्यावा. बचत गटांनी देखील आपल्या कार्यकक्षा अधीक व्यापक कराव्या अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.कार्यशाळेत स्वच्छ भारत अभियान व घनकचरा व्यवस्थापन, विमा योजना, आरोग्य व पोषण अधिकार व सेवेची माहिती, भाजीपाला लागवड व उपभोग, पशु व आरोग्य आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. रोजगार मेळाव्यात नोकरीसाठी निवड केलेल्या युवकांना जॉब ऑफर लेटर देण्यात आले. स्वयंसहाय्यता समुहसंघ, उपजिविका, बँक लिंकेज, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणा:या ग्रामसंघ, गट यांच्या कार्याची माहिती घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आभार रवींद्र सूर्यवंशी यांनी मानले. जिल्हाभरातील महिला उपस्थित होत्या.
नंदुरबार जिल्हा परिषदेत कौशल्य विकासासाठी महिलांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:58 IST