लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालय विसरवाडी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सिकलसेल व रक्तगट तपासणी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ९१ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ए.टी. पाटील होते. समुपदेशक नितेश वळवी यांनी म्हणाले की, आदिवासी समाजात इतर समाजाच्या तुलनेत सिकलसेल आजाराचे प्रमाण जास्त आहे. या आजाराबाबत जागृत असणे व वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. दीपक वाघ यांनी विद्यार्थ्यांना एड्स या आजाराबाबत माहिती देऊन हा आजार होऊ नये यासा काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.पाटील यांनी जीवनात अभ्यास, पैसा, नोकरी जसे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आरोग्य बळकट असणे हे जास्त महत्त्वाचे आहे.कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.आर. राठोड व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विसरवाडी महाविद्यालयात सिकलसेलबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:23 IST