शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गौणखनिज वसुलीबाबत ग्रा.पं.ची उदासिनता : तळोदा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 13:11 IST

तीनवेळा स्मरणपत्रे देवूनही ग्रामपंचायतीकडून प्रतिसाद नाही

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : ग्रामपंचायतींमार्फत सुरू असलेल्या विकास कामांच्या माहितीसाठी तब्बल तीन वेळा स्मरणपत्रे देऊनही पंचायतींनी अजून पावेतो महसूल प्रशासनाला माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे रॉयल्टीच्या वसुलीबाबत प्रशासनापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे खाजगी वाळूवाहतूकदारांवर प्रशासन कडक भूमिका घेत आहे तर दुसरीकडे त्यांचीच दुसरी यंत्रणा त्यास हरताळ फासत आहे. प्रशासनाच्या अशा दूजाभावाच्या भूमिकेबाबत नाराजीचा सूर आहे.गौणखनिज वसुली प्रकरणी यंदा तळोदा महसूल प्रशासनास जिल्हा प्रशासनाने तब्बल चार कोटी रुपयांचे टार्गेट दिले आहे. साहजिकच गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रशासनानेदेखील अवैध गौणखनिज प्रकरणी तीव्र मोहमी हाती घेतली आहे. यासाठी वेगवेगळी पथकेच तैनात करण्यात आली आहे. ही पथके रात्रींबेरात्री अशी वाळू वाहतूक करणा:या वाहनांवर नजर ठेवून असतात. त्यातही प्रशासनाचे लक्ष गुजरात हद्दीतून विनापरवाना वाळू वाहतूक करणा:या वाळूमाफीयांवर केंद्रीत केले आहे. नवीन नियमानुसार वाळूबरोबरच वाहनांवरही अव्वाचा सव्वा कारवाई केली जात असल्यामुळे अशा ठेकेदारांसह वाहनधारकांमध्ये अक्षरश: दहशत पसरली आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायदेखील ठप्प झाला आहे. वाळूच्या रॉयल्टी प्रकरणी महसूल प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींकडून आपल्यामार्फत सुरू असलेल्या विकास कामांची माहिती मागविली आहे. मात्र या ग्रामपंचायतींच्या प्रशासनांनी अजून पावेतो महसूल प्रशासनास माहिती उपलब्ध करून दिली नसल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर प्रशासनाने तब्बल तीन वेळा ग्रामपंचायतींना स्मरणपत्र पाठविले आहे. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याऐवजी प्रशासनाच्या पत्राला एकप्रकारे केराची टोपलीच दाखविली असल्याचे स्पष्ट होते. वास्तविक खाजगी वाळूवाहतूकदारांवर प्रशासन रात्रींबेरात्रीची पाळत ठेवून त्यांच्याकडून नियमानुसार रॉयल्टी वसलू केली जात आहे. तर दुसरीकडे त्यांचीच दुसरी यंत्रणा हरताळ फासत आहे. या यंत्रणेबाबत प्रशासनाने घेतलेल्या गिळगिळीत भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.