शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

नंदुरबारातील बाजारपेठेवर ‘गुढीपाडवा फिव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 11:20 IST

नंदुरबार : मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले असून परिणामी बाजारपेठेत तेजी आली आहे़ शुक्रवारी संसारोपयोगी साधनांसह, ईलेक्ट्रॉनिक ...

नंदुरबार : मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले असून परिणामी बाजारपेठेत तेजी आली आहे़ शुक्रवारी संसारोपयोगी साधनांसह, ईलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने, सोने-चांदी बाजारात मोठी उलाढाल झाली़ बाजारातील या चैतन्यमयी सुरुवातीने व्यापारी वर्गही सुखावला होता़जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे दिवाळीपासून बाजारावर अवकळा पसरली होती़ परिणामी गेल्या चार महिन्यात बाजार सुस्तावला होता़ यातून उलाढालीवर परिणाम झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता होती़ गुढीपाडवा हा महत्त्वपूर्ण उत्सव मानला जात असल्याने नागरिकांकडून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती़ ही अपेक्षा बऱ्याचअंशी खरी ठरली असून ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला मोठा बुस्टर मिळाल्याचे बाजारातील बुकींगवरुन स्पष्ट झाले होते़ केंद्र शासनाने यंदाच्या बजेटमध्ये चारचाकी वाहनांच्या किमती वाढवल्या होत्या़ १ एप्रिलपासून नवीन किमती लागू झाल्या असल्या तरी त्यापूर्वीच बºयाच जणांनी बुकींग करुन ठेवल्याने वाहनबाजारातील मंदी काहीशी दूर झाल्याचे चित्र आहे़ गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला विविध ब्रँडच्या चारचाकी वाहनांच्या शोरुममधून २० वाहने बाहेर पडली होती़ गुढीपाडव्यालाही किमान ३५ ते ४० वाहनांची डिलीव्हरी होणार असून ऐनवेळी येणाºया ग्राहकांसाठी शोरुम चालकांकडून सोय करुन ठेवली गेल्याचे सांगण्यात आले आहे़ शहरातील होम अप्लायन्सेस विक्रेत्यांकडे गेल्या आठवड्यापासून २०० जणांनी विविध वस्तंूची बुकींग करुन ठेवली होती़ यात फ्रीज, कुलर आणि एअर कंडीशन यांची सर्वाधिक संख्या होती़ हे सर्व बुकींग शुक्रवारीच निकाली काढण्यात आले़ तर नेहरु चौकातील काही दुकानांमध्ये सायंकाळपर्यंत ४० ग्राहकांना फ्रिज आणि कुलरची खरेदी केली होती़ फायनान्स आणि रोख या स्वरुपात ही खरेदी झाली़शहरातील शोरुमधून ३० सेडान आणि हॅचबॅक सिरीज कारसह सेव्हन सिटर वाहनांची विक्री झाली़ शहरातील एका शोरुमधून एसयुव्ही श्रेणीतील ४ वाहनांची विक्री झाली़ सोबत मालवाहू आणि रिक्षा दर्जाच्या १० वाहनांची बुकींग झाल्याचे सांगण्यात आले़ मोठ्या वाहन बाजारात गेल्या आठवड्यापासून ६५ पेक्षा अधिक वाहनांची बुकींग आणि विक्री झाली़दुचाकी शोरुम्समध्येही शुक्रवारी सकाळपासून उत्साह होता़ स्कूटर दर्जाच्या वाहनांना सर्वाधिक पसंती असल्याचे यंदाही बुकींगरवरुन स्पष्ट झाले़ १६० ग्राहक गुरुवारपासून आपल्या हक्काची गाडी घेऊन गेले़ तर दुसरीकडे मोटारसायकल दर्जाची २०० वाहने बुक झाल्याची माहिती देण्यात आली़ गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मंगळबाजार आणि सुभाष चौकात खरेदीसाठी बºयापैकी गर्दी होती़ बाजारात रात्री उशिरापर्यंत उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आली़