शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी केला बोंडग्रस्त भागाचा दाैरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:56 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे शिवारातील शेतात गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव असलेल्या कापूस पिकाची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी शेतक-यांसोबत संवाद साधत माहिती घेतलीयावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.खरबडे, तालुका कृर्षी अधिकारी आर.एम.पवार, मंडळ कृर्षी अधिकारी आर.सी.हिरे उपस्थित होते. निसर्गांच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिसून येत असल्याने गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव झालेल्या  शेतीचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी करण्याचे आदेश ॲड. पाडवी यांनी दिले.   त्यांनी शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे तसेच किटकनाशक फवारणी करण्याच्या सूचनाही दिल्या. संकट काळात शासन शेतकऱ्यांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.. 

भरपाईची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात गुलाबीबोंड अळीचा प्रादुर्भाव वाढीस लागत आहे. यातून शेतक-यांचे नुकसान होत आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे. जिल्ह्यात यंदा एक लाख १८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड होती. यातील  निम्मे कापसाची वेचणी अद्याप शिल्लक असून या पिकावर बोंडअळी पडत आहे.