शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
6
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
7
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
8
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
9
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
10
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
11
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
12
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
13
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
14
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
15
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
16
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
17
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
18
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
19
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
20
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”

चांदसैली घाटात संरक्षक कठडय़ांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 12:58 IST

कोठार ते धडगाव दरम्यानचा रस्ता : प्रवाशांचा जीव मुठीत घेवून प्रवास

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : सातपुडा पर्वतरांगेतील धडगाव ते कोठार दरम्यान असणा:या चांदसैली घाटात अनेक ठिकाणी रस्त्याची व संरक्षक कठडय़ांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे घाटातील वाट अधिकच बिकट ठरत असून, प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.तीव्र चढाव व उतार, नागमोडी वळणे यामुळे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक घाट म्हणून चांदसैलीचा घाट ओळखला जातो. तळोद्याहून धडगांवकडे जातांना कोठारपासून पुढे घाटाला सुरूवात होते. नंदुरबारहून धडगांवला जाण्यासाठी चांदसैली घाट मार्गे अंतर कमी आहे. त्यामुळे बहुतेक वाहनधारक धडगांवला जाण्यासाठी चांदसैली घाटमार्गेच जाणे पसंत करतात. दिवसभर वाहनांची वर्दळ असणा:या या घाट मार्गात अनेक ठिकाणी रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता दरीच्या कडेला खचलेला आहे तर काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध भगदाड पडलेले आहेत. तीव्र चढाव व उतारामुळे रस्त्याच्या मधोमध असणारे हे भगदाड वाहधरकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. त्यामुळे अचानकपणे वाहने आदळली जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण असते. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.याशिवाय या घाटात सुमारे एक ते दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या संरक्षक कठडय़ांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणच्या संरक्षक कठडय़ांवर वाहने आदळली गेल्याने त्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे तर काही ठिकाणच्या संरक्षक कठडय़ांच्या खालील जमीन खचल्याने संरक्षक कठळे उन्मळून पडले आहेत.            रस्त्याची व संरक्षक कठडय़ाच्या दुरवस्थेने घाटातील प्रवास करतांना प्रवाश्यांचा जीव टांगणीलाच    असतो.कोठारपासून पुढे धडगांवपर्यतच्या घाटातील रस्त्यात रस्ता दुरुस्ती व अन्य कामांसाठी  टाकण्यात आलेली खडी व मुरूम रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी वर्षभर तशीच पडलेली दिसून येते. घाटातील अरुंद रस्त्यावर खडी, मुरूम व रेती पसरत असल्यामुळे राहदारीस मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होतात. शिवाय त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार देखील सातत्याने घडून    येतात.चांदसैली घाटातील काही रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळोदा उपविभागात तर काही रस्ता हा नंदुरबार उपविभागाच्या हद्दीत येतो. गेल्या अनेक वर्षापासून चांदसैली घाटातील रस्त्याची, संरक्षक कठडय़ांची दुरवस्था, संरक्षक कठडय़ांचा अभाव अश्या समस्या सातत्याने निर्माण होत आलेल्या आहेत. या समस्यांवर नेहमीच  तात्पुरती उपाययोजना करण्यात येते. मात्र कायमस्वरुपी उपाय केले जात नसल्यामुळे वर्षभर या घाटातून प्रवास करतांना प्रवाशांचा जीव टांगणीलाच असतो. वर्षभर विविध कारणांनी अपघातदेखील घडून येत असतात. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.