शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे बाजारात ‘कही खुशी कही गम’

By admin | Updated: July 4, 2017 00:57 IST

पॉलिसी प्रीमियमच्या रकमेत वाढ : व्यावसायिकांची नोंदणी ठप्पच

नंदुरबार : देशात 1 जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू झाली आह़े या करप्रणालीचा बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला असून नंदुरबारच्या बाजारपेठेत यामुळे ‘कही खुशी कही गम’ असेच चित्र आह़े नंदुरबार शहरात अद्यापही व्यावसायिकांकडून ऑनलाइन बिलिंग सिस्टिम नसल्याने जीएसटी कसा कपात करावा, याबाबत अनभिज्ञता आह़े विविध कंपन्यांनी आपापल्या वस्तूंवर जीएसटी लावून व्यापा:यांना मालाची विक्री सुरू केल्याने व्यापारी बांधवांसमोर संभ्रम निर्माण झाला आह़े तर दुसरीकडे बँका आणि विमा पॉलिसी यांच्यासाठी ग्राहकांना जादाचा सेवाकर द्यावा लागणार आह़े मात्र याबाबत कोणत्याही प्रकारचे नवीन आदेश बँका आणि विमा विभाग यांना प्राप्त झालेले नसल्याने त्यांच्याही कामकाजावर परिणाम जाणवत आह़े बँकांच्या विविध समस्यांवर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनात सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती़ या बैठकीत वाढ झालेल्या करांची अंमलबजावणी बँकांनी कशी करावी, याबाबत चर्चा करण्यात आली़ कृषी उत्पन्न बाजार समितीत याबाबत अद्यापही आदेश प्राप्त झालेले नसल्याने सर्व प्रकारच्या धान्य खरेदी आणि विक्री ही पूर्वीप्रमाणचे सुरू असल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार जिल्ह्यात जीएसटी या करप्रणालीबाबत व्यापा:यांकडे अद्यापही योग्य ती माहिती नसल्याने जुन्याच करांच्या हिशेबाने खरेदी -विक्रीचे व्यवहार सुरू आहेत़ बॅँकांच्या ग्राहकांना जीएसटी लावण्याबाबत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांना अद्याप आदेश आलेले नाहीत़ हे आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल़ तूर्तास जिल्ह्यात जुन्या सेवाकरांच्या हिशेबाने सुरू आह़े -संजय धामणकर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नंदुरबारविमा संरक्षण घेतलेल्या 2016 नंतरच्या ग्राहकांना प्रीमियम भरणा करताना 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आह़े एलआयसी किंवा खासगी पॉलिसी घेतलेल्या ग्राहकांना हा कर बसेल, नव्या प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच नेमकी स्थिती समजून येईल़ -राजू अनारसे, विमा प्रतिनिधी़