शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चर्मकार समाजातील 18 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चर्मकार समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ्यात 18 जोडप्यांचे शुभमंगल झाले. जोडप्यांना विविध संसारोपयोगी वस्तू देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चर्मकार समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ्यात 18 जोडप्यांचे शुभमंगल झाले. जोडप्यांना विविध संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या. महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशातील जोडपे देखील यात सहभागी झाले होते. शहरातील अभिनव विद्यालयाच्या प्रांगणात या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्यासाठीच्या नियोजनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरातमध्ये जावून आयोजक समाज बांधवांनी  जनजागृती केली. त्याचा चांगला परिणाम होऊन यंदा 18 जोडपे सहभागी झाले. सहभागी वरांची सकाळी वाजतगाजत वरमिरवणूक काढण्यात आली. जाती रिवाजाप्रमाणे यावेळी सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले.आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरिष चौधरी, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, समाज कल्याण अधिकारी राकेश महाजन, नगरसेवक प्रमोद शेवाळे, चारूदत्त कळवणकर, ईश्वर चौधरी, राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, उद्योगपती मनोज रघुवंशी, डॉ.रवींद्र चौधरी, पोलीस निरिक्षक नंदवाळकर, पोलीस उपनिरिक्षक आनंदा पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांनी समाजाच्या या उपक्रमाचे कौतूक केले. अशा प्रकारचे विवाह सोहळे प्रत्येक समाजात आयोजित करून वेळ, पैसा यांची बचत करावी. महागाईच्या जमान्यात या सोहळ्याची आवश्यकता असून यात कुणीही कमीपणा न मानता समाज विकासासाठी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.या वेळी धडगाव येथील चिंधू चव्हाण व धुळे येथील छगण ठाकरे यांना समाज भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. चर्मकार समाज सामुहिक विवाह आयोजन समितीचे अध्यक्ष दगडू अजिंठे, कार्याध्यक्ष दिलीप तिजवीज यांच्यासह संयोजन समितीतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचलन रमेश मलखेडे व चव्हाण यांनी केले. यशस्वीतेसाठी चतुर अहिरे, मनोज समशेर, हंसराज अहिरे, महेंद्र चव्हाण, ईश्वर सोनवणे, विनोद अहिरे, विजय अहिरे, मोहन अहिरे, अजरून अहिरे, संतोष अहिरे, राकेश कंढरे व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.