शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
3
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
4
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
5
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
6
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
7
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
8
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
9
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
10
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
11
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
12
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
13
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
15
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
16
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
17
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
18
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
19
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
20
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

नर्मदा प्राधिकरणाच्या सल्लागारांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नर्मदाकिनारी मत्स्य व्यवसायासंबंधात पिंज-यातील मत्स्यसंवर्धनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. नर्मदा सरोवर प्राधिकरणाचे सल्लागार डॉ.अफरोज अहमद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नर्मदाकिनारी मत्स्य व्यवसायासंबंधात पिंज-यातील मत्स्यसंवर्धनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. नर्मदा सरोवर प्राधिकरणाचे सल्लागार डॉ.अफरोज अहमद यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमाला नर्मदा आंदोलकांनी आक्षेप घेत त्यांना काही काळ घेराव घातला. तसेच पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबतही त्यांना जाब विचारला.याबाबत आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, सरदार सरोवर जलाशयामध्ये मत्स्यव्यवसाय हा विस्थापित आदिवासी व पारंपारिक मच्छीमारांच्या सहकारी समित्यांमार्फत चालतो आहे. या अधिकारासाठी नर्मदा बचाओ आंदोलनाने अनेक वर्षे संघर्ष केला तसेच राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवर संवादही केला. पुनर्वसनामध्ये ह्या आजीविकेचा अधिकाराचा आग्रहही धरला. महाराष्ट्रात पाच व मध्य प्रदेशात 31 समितींची नोंदणी झाली. मात्र कार्यक्रमात सहकारी सोसायट्यांचा उल्लेखही नाही. उद्घाटनाचा घाट डॉ.अफरोज अहमद यांच्या हस्ते घातला यावर हरकत घेणे आवश्यक आहे. सहकारी सोसायट्यांचे कार्यक्रमात स्थान काय याचाही विचार अधिका-यांनी करणे गरजेचे असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.अहमद यांनी मध्यप्रदेशातील 192 गावे व एक नगर सरदार सरोवर बाधित असताना तिथे पूर्ण दुर्लक्ष केले. मात्र जेव्हा जेव्हा मोचार्ने गेलो तेव्हा प्रदीर्घ चर्चा आमच्यासह केली मात्र कार्य नाही व खरी आकडेवारी, अहवालही नाही. पुनर्वसनाच्या कार्याचा दाखवल्यानंतर पुढील वार्षिक अहवालात 2,143 कुटुंबांना जमीन देणे बाकी असल्याचे अहमद यांनीच दाखविले.  अहमद सल्लागार होऊ शकत नाहीत. असेही आंदोलकांनी ठामपणे सांगितले.

विस्थापीतांच्या विविध प्रश्नांसदर्भात विस्थापीतांनी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू केले आहे. दुस:या दिवशी देखील आंदोलन कायम होते. शनिवारी सायंकाळी उशीरार्पयत नर्मदा प्राधिकरणाच्या कार्यालयात चर्चा सुरू होती. त्यात विविध मागण्या लेखी घेण्यासाठी आंदोलक आग्रही होते. 

गेल्या दोन दिवसांपासून शेकडो विस्थापीत नंदुरबारात ठाण मांडून आहेत. त्यांच्या प्रश्नांसदर्भात आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, लतिका राजपूत, नुरजी वसावे, सियाराम पाडवी, चेतन साळवे, ओरसिंग पटले बाजू मांडत होते. सायंकाळी उशीरार्पयत यासंदर्भातील चर्चा सुरू होती.