शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भूजल तपासणीत जिल्हा अव्वल, सुविधेत मात्र बोंब

By admin | Updated: January 8, 2017 23:48 IST

प्रयोगशाळेचा पत्ता सापडेना : सामान्य रुग्णालय कर्मचारी निवासस्थानातून कारभार

 नंदुरबार : जिल्ह्यातील जलनमुन्यांची तपासणी करून तत्काळ निर्णय देणारी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा ‘बेपत्ता’ आह़े देशात आणि राज्यात अव्वल असलेल्या या प्रयोगशाळेत सुविधा देण्याबाबत आरोग्य विभागाची उदासिनता तेथील कामकाजावर परिणामकारक ठरत आह़े स्वच्छता विभागाच्या मुख्य संकेतस्थळावर सेकंदात दिसणारी ही प्रयोगशाळा प्रत्यक्षात शोधण्यासाठी काही तास फिरफिर करावी लागत आह़े     गेल्या तीन वर्षात नागरिकांना जलजन्य आजारांच्या संकटांपासून वाचवण्यासाठी सातत्याने प्रशासनाला जलनमुने तपासणीची माहिती देत कामकाज सुरू ठेवणा:या या जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत अनेक समस्या आहेत़ हक्काची इमारत नसलेली ही प्रयोगशाळा आहे कुठे, याचा शोध लागत नसल्याने नमुने घेऊन येणा:यांची प्रचंड फिरफिर होत़ेगेल्या दीड वर्षापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील ही प्रयोगशाळा रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्मचारी वसाहतीत स्थलांतरित करण्यात आली़  या स्थलांतरानंतर सुविधा मिळतील या आशेवर असलेल्या कर्मचा:यांच्या अव्वल कामकाजाकडे आरोग्य विभागानेच दुर्लक्ष करत त्यांच्या माथी केवळ समस्या मारल्या़ नमुने तपासणीच्या प्रयोगासाठी लागणारे मुबलक पाणी, बसण्यासाठी खुच्र्या, लेखी कामासाठी टेबल या गोष्टींचा अभाव असूनही याठिकाणी कामकाज सुरूच ठेवण्यात आले होत़े प्रयोगशाळेसाठी वर्षभरापासून सामान्य रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीत जागा देण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी अद्याप त्याठिकाणी वीज नसल्याने स्थलांतर झालेले नाही़ जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात कर्मचारी वसाहतीतील नर्मदा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील प्रयोगशाळेत वेळेवर पाणी आणि वीज पुरवठा होत नसल्याने कर्मचारी त्रस्त आहेत़ या इमारतीत जिल्हा सार्वजनिक प्रयोगशाळा असा कोणताही फलक नसल्याने  जलनमुने घेऊन येणा:या ग्रामपंचायत  कर्मचा:यांची सुमारे तासभर फिरफिर होत़े आधीच शहराबाहेर सामान्य रुग्णालयात पोहोचण्यासाठी होणारी कसरत आणि तेथे गेल्यानंतर ‘नर्मदा’ इमारतीतील प्रयोगशाळेचा वाढणारा शोध यामुळे अनेकांच्या घशाला कोरड पडत आह़े