शहरातील धुळे रस्त्यावरील गांधीनगर भागातील पेन्शनर भवन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संतश्री भगवान बाबा यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ महिला शोभा रमेश गवते यांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी सरिता अनिल कागणे यांनी सामाजिक उपक्रमात महिलांनी संघटित होऊन सहभागी होण्याचे आवाहन केले तर संतश्री भगवान बाबा यांच्या जीवन कार्याला जिल्हाध्यक्ष केतन गिते यांनी उजाळा दिला. वंजारी सेवा संघाचे विभागीय सहकार्याध्यक्ष देवीदास पेटकर यांनी विविध सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास वंजारी सेवा संघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अर्चना गणेश काकडे, उपाध्यक्षा सरिता अनिल कागणे, सचिव विद्या राहुल गाभणे, सहसचिव सुरेखा देवीदास पेटकर, कोषाध्यक्ष शोभा रमेश गवते, संघटक सोनाली बंडू गवते, सल्लागार मनीषा भगवान धात्रक, सोनाली शैलेंद्र गवते, सदस्या सरला भटू आघाव, कविता भूपेंद्र आघाव, सारिका केतन गीते, आशा सुरेश सांगळे, पूर्वा राहुल गाभणे, जिल्हा सचिव राहुल गाभणे, उपाध्यक्ष देवेंद्र आघाव, संपर्क प्रमुख लक्ष्मण बांगर, सहसंपर्क प्रमुख दिनेश आघाव, जिल्हा संघटक मोहन सानप, विजय प्रधान आदींसह वंजारी समाज बांधव उपस्थित होते. संतश्री भगवान बाबा यांच्या भजन कीर्तन गीतांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.
वंजारी सेवा संघातर्फे भगवान बाबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST