लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वातंत्र्य संग्रमात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या नंदुरबारातील शिरिषकुमार यांच्यासह त्यांच्या साथीदारांचा स्मृती दिन अर्थात शहिद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना देखील देण्यात आली. दरम्यान, कोरोनामुळे मोजक्या उपस्थितांमध्येच यावेळी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात नंदुरबारच्या बालशहिदांचे बलिदान संपुर्ण देशात गाजले होते. शिरिषकुमार यांच्यासह पाच बालके शहिद झाली होती. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी नंदुरबारातील माणिक चौकात शहिद स्मारक उभारण्यात आले आहे. या ठिकाणी बुधवारी अभिवादन करण्यात आले.शहिद स्मृतीतर्फे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ विधितज्ज्ञ राजेद्र रघुवंशी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अॅड.रमणलाल शाह, संस्थापक अध्यक्ष डॉ.पीतांबर सरोदे, निंबाजीराव बागुल, प्राचार्य डॉ.डी.एस.पाटील, प्रा.राजेद्र शिंदे, किर्ती सोलंकी, दिपक शाह, पांडूरंग माळी, संदीप चौधरी आदी उपस्थित होते.यावेळी पोलीस दलतार्फे बँड पथकाने तसेच हवेत तीन फायरिंग करून मानवंदना दिली.
बाल शहिदानांना अभिवादनासह मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:09 IST