शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांनी केल्या आपल्या चाव्या जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 21:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रलंबित न्याय मागण्यांसाठी राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनएच 136)कडून सुरू झालेल्या असहकार आंदोलनाची धार तीव्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रलंबित न्याय मागण्यांसाठी राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनएच 136)कडून सुरू झालेल्या असहकार आंदोलनाची धार तीव्र करण्यात आली असून, जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी संबधीत गटविकास अधिका:यांकडे चाव्या सुपूर्द केल्या. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.नंदुरबारात गुरुवारी सकाळी 11 वाजता युनियनचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वळवी व तालुकाध्यक्ष आर.डी पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गट विकास अधिकारी अशोक पटाईत यांची भेट घेऊन त्यांना ग्रामपंचायतींच्या चाव्या ताब्यात दिल्या. सेवाविषयक प्रलंबित प्रश्नावर न्याय मार्गाने शासनाकडे पत्रव्यवहार, बैठका घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करण्यात आली. प्रशासकीय स्तरावर समस्या जाणून घेऊन सोडवणूक होणे बाबत वारंवार आश्वासन देण्यात आले. परंतु त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे ग्रामसेवक संवर्गामध्ये प्रचंड असंतोष व नाराजी निर्माण झाल्याने राज्यभरात असहकार व काम बंद आंदोलन पुकारण्यात येत असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र वळवी, तालुकाध्यक्ष आर.डी.पवार,सचिव डि.जी सूर्यवंशी, टी.के खरे, वाय.बी देसले, विद्या शिरसाठ, अर्चना चव्हाण, शितल अहिरे, ज्योती देवरे, अनिल पाटील, गिरीश घुगे, विजय पाटील, भटू पाटील, सी.जे चौधरी, प्रवीण चौधरी, राजू चौधरी, आर.सी माळी आदी उपस्थित होते.मंत्री, प्रधान सचिवांशी सकारात्मक चर्चापंचायत समितीच्या आवारात ग्रामसेवकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र वळवी म्हणाले, बुधवारी युनियनच्या राज्यस्तरीय पदाधिका:यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा केली. काही मागण्या मान्य जरी झाल्या तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या 15 दिवसांपूर्वी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन कोटय़ावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जनभावनेचा आदर करीत आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य आंदोलनातून वगळण्यात आलेले आहे. काम बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामे ठप्प झाली आहेत. ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे पहिल्याच दिवशी ग्रामविकासाच्या योजनांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे. ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती       देणे. करवसुल करणे, जनतेला विविध प्रकारचे दाखले देणे. जन्म-मृत्यू, उपजतमृत्यू नोंदणीचे कामे. बांधकाम मजूर नोंदणीचे कामे, विवाह नोंदणी कामकाज ठप्प झालेली आहेत.