हिरालाल रोकडे । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जिल्हा परिषदेची निवडणूक जानेवारी महिन्यात होणार असून शहादा तालुक्यात सर्वाधिक 14 गट आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहादा तालुक्यात भारतीय जनता पक्षात मोठय़ा प्रमाणात इनकमिंग झाल्याने तसेच काँग्रेसतर्फे कुठल्याही मोठय़ा नेत्याने प्रचारसभा घेतली नसतानाही ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात मते मिळाल्याने आगामी निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकंदरीत भारतीय जनता पक्षाकडे नेत्यांची मोठी फळी असली तरी काँग्रेसतर्फे त्यांना आव्हान दिले जाईल, अशी परिस्थिती आहे.विधानसभा निवडणुकीत शहादा तालुक्यात भारतीय जनता पक्षाला मोठय़ा प्रमाणात मते मिळाली. त्या तुलनेत मोठी प्रचार यंत्रणा राबवली नसतानाही काँग्रेसला मिळालेली मते उल्लेखनीय आहेत. गत निवडणुकीत तालुक्यातील 13 गटांपैकी सर्वाधिक आठ जागा काँग्रेस, चार जागा राष्ट्रवादी काँग्रेस व एका जागेवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला होता. आगामी निवडणुकीत तालुक्यातील गटसंख्या एकने वाढली असून आता तालुक्यात 14 जिल्हा परिषदेचे गट आहेत.आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षापुढे गत निवडणुकीत मिळालेल्या जागा टिकविण्याचे आव्हान असून भारतीय जनता पक्षाकडे तालुक्यावर आपले निर्विवाद वर्चस्व राखण्याचे आव्हान आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत तालुक्यात भारतीय जनता पक्षाला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याने तसेच मोठय़ा प्रमाणात नेत्यांचे इनकमिंग झाल्याने गत निवडणुकीत असलेली एक ही संख्या वाढविण्याचे आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जागा असल्या तरी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनी राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परिणामी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गावीत यांच्यासोबत त्यांच्या अनेक कार्यकत्र्यानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले होते. काँग्रेस पक्षाची तालुक्यात असलेली ताकद विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाली आहे. कुठल्याही मोठय़ा नेत्याचे नेतृत्व नाही, पक्षाचे पदाधिकारी नसतानाही ग्रामीण भागातील जनता पाठीशी भक्कमपणे उभी राहिली असल्याने या निवडणुकीत काँग्रेसतर्फे कुठली रणनीती आखण्यात येते याकडेच सा:यांचे लक्ष लागून आहे.विधानसभेतील अपक्ष उमेदवार तथा सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जेलसिंग पावरा यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केली. त्यांना सुमारे 21 हजार मते मिळाली. ही सर्व मते राणीपूर व ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्यामार्फत जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे त्यांचे कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवत आहेत. फक्त जिल्हा परिषद निवडणूक कोणत्या पक्षाच्या ङोंडय़ाखाली लढवावी यावर त्यांच्यात चर्चा सुरू असून शहादा तालुक्यात त्यांच्यामार्फत सात ते आठ जागा लढविण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे.जिल्हा परिषदेचा एक गट वाढल्याने पंचायत समितीचेही दोन गण वाढले आहेत. यापूर्वी पंचायत समितीचे 26 सदस्य होते ते आता 18 झाले आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेस 13, राष्ट्रवादी काँग्रेस 12 व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एक अशी सदस्य संख्या होती. यात पहिली अडीच वर्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने पंचायत समितीवर सत्ता कॉंग्रेसची होती. मात्र अडीच वर्षाच्या कालखंडानंतर पंचायत समितीत नाटय़मय घडामोडी होऊन सत्तांतर झाले व राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीवर ताबा मिळविला. आता पुढील निवडणुकीत पंचायत समितीवर कोणत्या पक्षाचा ङोंडा फडकेल याकडे सा:यांचे लक्ष लागून आहे.
राज्यात भाजप-सेना युती नसल्याने आता जिल्हा परिषद निवडणुकीत या दोन्ही पक्षांमध्ये शहादा तालुक्यात संघर्ष होईल, अशी स्थिती आहे. याला कारण म्हणजे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश. रघुवंशी यांना मानणारा मोठा गट शहादा तालुक्यात आहे. परिणामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेतही इनकमिंग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटील, राजेंद्र गावीत, जि.प.चे माजी सभापती डॉ.भगवान पाटील या दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरवणारी आहे. मुळात गेल्या अनेक वर्षापासून या नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष असल्याने आगामी निवडणुकीत मतदार कोणाच्या पारडय़ात आपल्या मताचे दान टाकतात याकडे सा:यांचे लक्ष लागून आहे.