शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

राज्यपालांनी दिला आदिवासींना उत्कर्षाचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 17:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मी देखील अतीदुर्गम डोंगराळ भागातून आलो आहे. आजही माङया गावाला जाण्यासाठी एक-दिड किलोमिटर पायी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मी देखील अतीदुर्गम डोंगराळ भागातून आलो आहे. आजही माङया गावाला जाण्यासाठी एक-दिड किलोमिटर पायी चालावे लागते. त्यामुळे तुमचे दु:ख आणि माङो दु:ख एक आहे या शब्दात आदिवासींची आपुलकी साधत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दु:खाचे रडगाणे करत बसण्यापेक्षा शिका, मेहनत घ्या, संघर्ष करा आणि जिद्दीने जिवनाचा उत्कर्ष साधा असा मंत्र त्यांनी यावेळी आदिवासींना दिला.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गुरुवारी सातपुडय़ाच्या अतीदुर्गम भागातील मोलगी व भगदरी येथील दौ:यावर आहेत. नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे अगोदर सकाळी साडेनऊ च्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर मोलगीला आले. तेथून शासकीय विश्रामगृहावर अधिका:यांशी चर्चा केल्यानंतर मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्राचे त्यांनी उद्घाटन केले. त्यानंतर तेथे दाखल बालकांची पहाणी करून त्यांच्या पाल्यांशी संवाद साधला. त्यानंतर ग्रामिण रुग्णालयाची पहाणी केली. तेथून थेट भगदरी येथील अंगणवाडी व लघु तलावाची पहाणी केली. त्याच ठिकाणी बांधण्यात आलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटनही त्यांनी केले. त्या ठिकाणी आदिवासीच्या सांस्कृतिक ठेव्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते त्याची पहाणी केली आणि तेथेच आदिवासींशी संवादही साधला. तत्पुर्वी आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी आदिवासी परंपरेनुसार त्यांना फेटा बांधून तसेच होळीतील प्रसिद्ध मोरखी टोप देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित आदिवासींनी वीज, पाणी, शिक्षण, रोजगार, आरोग्य, वनदावे, वनगावे आदी संदर्भातील प्रश्नांचा पाढा वाचला. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी विजेचा प्रश्न गांभिर्याने घेत संबधीत अधिका:यांच्या साक्षीने सहा महिन्यात 24 तास वीज पुरवठा करण्याबाबतच्या सुचना केल्या. 132 के.व्ही.चे केंद्र तात्काळ कार्यान्वीत करण्यासाठी मदतीची ग्वाही देतांना अधिका:यांनी जर मुदतीत काम पुर्ण केले नाही तर सहा महिन्यानंतर येथील आदिवासींसोबत आपणही या अधिका:यांना घेराव घालू असा मिश्कील टोलाही मारला. शासनाचा विविध योजनांचा लाभ लोकांर्पयत पोहचतो की नाही त्याचीही त्यांनी उपस्थितांकडून खातरजमा केली. विकासाचे काम सुरू राहील पण आपण आपली कामे व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मेहनत घ्या, मुलांना शिकवा, चांगले संस्कार द्या ते निश्चितच उद्याचे राष्ट्रपती होतील असे स्वप्न दाखवत त्यांनी आदिवासींना धीर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. आकांक्षीत जिल्ह्यासाठी असलेला कार्यक्रम या भागात राबविला जाईल त्यामुळे विकासाला गती येईल असेही त्यांनी सांगितले.