n लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल. जिल्ह्यात व खान्देशात राष्ट्रवादीची ताकड एकनाथ खडसे यांच्या प्रवेशामुळे वाढली आहे. आता सर्वांनी एकदिलाने काम करून पक्ष क्रमांक एकवर आणण्यासाठी मेहनत घ्यावी असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलतांना केले. शहादा येथे पाटीदार मंगल कार्यालयात राष्ट्रवादी तर्फे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, माजी आमदार उदेसिंग पाडवी, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे, माजी आमदार नरेंद्र पाडवी, नगरसेवक इक्बाल शेख, सागर तांबोळी, कमलेश चौधरी, जकीरमिया जहागीरदार, शांतीलाल साळी, चंद्रकांत पाटील, एन. डी. पाटील, रवींद्र मुसळदे, किरण शिंदे, सुरेंद्र कुवर, नितीन पाडवी, ॲड. अश्विनी जोशी, पुष्पा गावित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.देशमुख म्हणाले, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु कालांतराने पक्षांतर केले. काही नेते दुसऱ्या पक्षात गेल्याने सध्या राष्ट्रवादीची अवस्था जरी कमी असली परंतु पक्षातले शिलेदारांनी पक्ष मजबुतीसाठी एकदिलाने काम करून पक्षनिष्ठा ठेवल्यास जिल्ह्यात चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ खडसे यांच्या फायदा महाराष्ट्रात होणार आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्षाला ताकत मिळणार आहे. संपूर्ण खान्देशात त्यांच्यामुळे वेगळेच चित्र निर्माण होणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने सरकार चालू आहे. सर्व पक्षाचे नेते एकत्र काम करीत आहे. पाच वर्षात या सरकारला कुठेही धक्का लागणार नाही. एकनाथ खडसे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यावर काँग्रेसचे प्रभुत्व कायम राहिले. जिल्ह्यातील एकही गाव असे नाही जिथे नाथाभाऊ पोहोचला नाही. पक्षवाढीसाठी जंगलात मुक्काम केला. कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या. डॉ विजयकुमार गावित व खासदार हिना गावित यांना भाजपात मीच आणले. आता सर्वांनी एकदिलाने काम करून पक्ष मजबूत करायच आहे. गट-तट तोडून कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवा व पक्षाची नव्याने बांधणी करा असा सल्लाही यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.सुत्रसंचालन विष्णु जोंधळे यांनी तर आभार एन. डी. पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी रवींद्र पाटील, मधुकर पाटील, दिनेश पाटील, सुभाष शेमले, रवींद्र ठाकरे, शशिकांत पाटील, जगदिश माळी, समर करंके, शुभम कुवर, महेंद्र कुवर, राज बिरारे आदींनी परिश्रम घेतले.
सरकार पुर्ण पाच वर्ष चालणार- राष्ट्रवादीचा मेळावा : अनिल देशमुख यांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 12:33 IST