शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकरी केंद्रबिंदू ठेवून सरकारने धोरणे राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 12:20 IST

पुरुषोत्तम पुरस्काराचे वितरण : शहाद्यात ना.धों. महानोर यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शेतकरी मेला तर राष्ट्र   मरेल आणि म्हणून शेतकरी जीवंत राहिला पाहिजे. सरकारने शेतकरी केंद्रबिंदू ठेवून धोरणे राबवली पाहिजेत, असे प्रतिपादन माजी विधान परिषद सदस्य व कवी ना.धों. महानोर यांनी पुरुषोत्तम पारितोषिक प्रदान सोहळ्याप्रसंगी केले.शहादा तालुक्याचे भाग्यविधाते स्व.पी.के. अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विचार मंथन व किसान दिन साजरा करण्यात आला. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री.पी.के. अण्णा पाटील फाऊंडेशन आयोजित या कार्यक्रमात पुरुषोत्तम पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रांगणात सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळ धुळेचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा, सचिव संजय मुंदडा, अ.भा. गुजर्र महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.रामसरण भाटी, मध्य प्रदेशचे आमदार डॉ.रामकृष्ण दोगणे, अ.भा. गुजर्र महासभेचे जनरल सेक्रेटरी डॉ.जिलेसिंग कपासीया, दिल्ली  प्रदेश गुजर्र महासभेचे अध्यक्ष  इंद्रराज चौधरी, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष चौधरी, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष  विजय चौधरी, उपनगराध्यक्षा  रेखा चौधरी, लखन भतवाल, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, दूध उत्पादक संघाचे चेअरमन रवींद्रसिंग राऊळ, साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील, व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर,   बापू जगदेव आदी मान्यवर उपस्थित होते.स्व.पी.के. अण्णा पाटील व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे प्रारंभी पूजन करण्यात आले. यंदाचा पुरुषोत्तम पुरस्कार कवी ना.धों. महानोर व इतिहासाचार्य वि.का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळ धुळे यांना देण्यात आला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ना.धों. महानोर, मदनलाल मिश्रा व संजय मुंदडा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी महानोर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात साने गुरुजींची ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या प्राथनेने करून पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, साने गुरुजींनी खान्देशात संस्काराची जी बिजे रोवली त्यात पी.के.अण्णा आहेत. संस्कारांची ओंजळ अण्णांनी भरून परिसरात नवी सृष्टी निर्माण केली. सत्तेत असो वा नसो अण्णांनी शेतकरी केंद्रबिंदू मानून परिसराचा विकास केला. शेतकरी समृद्ध करायचा असेल तर पाण्याचे  नियोजन महत्त्वाचे असल्याचे सांगून सरकारने धरणे बांधण्याची गती वाढवली पाहिजे, शेतकरी हिताचे धोरण राबवले पाहिजे, असे  सांगितले. पी.के. अण्णांच्या         कार्याचा गौरव करून आपण अण्णांसोबत काम केल्याचेही त्यांनी सांगितले. ‘या नभाने या भूमीला दान द्यावे’ या कवितेने त्यांनी मनोगताचा समारोप केला.राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौफेर फटके मारत राजकारणातील गुण-दोष मांडले. पी.के. अण्णांनी खान्देशशी नातं जोडत शिक्षणाचे जाळे उभारल्याचे सांगून त्यांच्या प्रय}ानेच हा परिसर फुलल्याचे सांगितले. पी.के. अण्णांनी शेतक:यांच्या विकासासाठी परिश्रम घेतले. खान्देशातील आमदारांनीही शेतक:यांसाठी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यासाठी सरकारने एकाचवेळी अनेक प्रकल्पांची कामे सुरू न करता एकावेळी एकच प्रकल्प हाती घेऊन तो पूर्ण केला पाहिजे. सरकारमध्ये असूनही जनतेच्या हितासाठी लोकप्रतिनिधी म्हणून टीका करावी लागते. लोकांचा विकास महत्त्वाचा असल्याने लोकांशी प्रामाणिक राहून राजकीय क्षेत्रातील लोकांनी काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पी.के. अण्णांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार माङया हस्ते दिला गेला हा माङया जीवनातील सर्वात मोठा क्षण असून तो कायम माङया स्मरणात राहील, असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी स्व.पी.के. अण्णांच्या कार्याचा परिचय करून दिला. शासनाची काहीही मदत न घेता जनतेच्या पैशातून अण्णांनी तालुक्याचा विकास घडविला. प्रामाणिकपणे काम केले तर माणूस यशस्वी होतो ही शिकवण अण्णांनी आम्हास दिली. पी.के. अण्णा फाऊंडेशनच्या माध्यमातून जलपुनर्भरण, रुग्णवाहिका असे विविध उपक्रम राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले. अण्णांच्या दूरदृष्टीतूनच साखर कारखाना, सूतगिरणी, कॉलेज उभे राहिल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा हा वारसा असाच पुढे चालू राहील, अशी ग्वाही दिली.आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, आमदार रामकृष्ण दोगणे, रामसरण भाटी, संजय मुंदडा यांनीही या वेळी मनोगत   व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य   मकरंद पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्राचार्य शरद पाटील यांनी केले.