शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणसरी ङोलत कानुबाईला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खान्देशची कुलदैवत कानुबाई मातेचा उत्सव जिल्हाभरात उत्साहातपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्रावणसरी अंगावर ङोलत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खान्देशची कुलदैवत कानुबाई मातेचा उत्सव जिल्हाभरात उत्साहातपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्रावणसरी अंगावर ङोलत भाविकांनी मातेला निरोप दिला. यानिमित्त सर्वत्र चैतन्य व उत्साहाचे वातावरण होते.प्रकाशा येथे भाविकांची गर्दीप्रकाशा, ता.शहादा येथील सूर्यकन्या तापी नदीत सोमवारी सकाळपासूनच कानु मातेच्या विसर्जनासाठी प्रकाशासह पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. पहिला श्रावण सोमवार असल्याने याठिकाणी भाविकांची तुरळक गर्दी दिसून आली. या वेळी परिसरातील भाविकांनी कानु मातेला डोक्यावर धरून घाटावर विसजर्नासाठी आणले होते. याप्रसंगी आरती केल्यानंतर पाण्यात उतरून देवीला स्वत:च्या हाताने स्नान घालून   विसर्जन करण्यात आले. दरम्यान, दुपारी दोन वाजेर्पयत परिसरातील भाविक वाजत गाजत डोक्यावरून कानुमातेला विसजर्नासाठी घाटावर आणत होते. त्यामुळे याठिकाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे प्रकाशातील तापी नदीदेखील दुथडी भरून वाहत असल्याने भाविकांनी नदीत उतरून कानू  मातेचे विसर्जन उत्साहपूर्ण वातावरणात केले.भर पावसात विसर्जन, खेतियाखेतिया, ता.शहादा येथे सामाजिक व पारिवारिक ऐकतेचे प्रतिक मानल्या जाणा:या कानुबाई मातेची स्थापना रविवारी मोठय़ा उत्साहात खेतिया येथे ठिकठिकाणी वाजत-गाजत स्थापना करण्यात आली होती.  सोमवारी ठिकठिकाणी स्थापना केलेल्या कानुबाई मातेची धूम धडाक्यात वाजत गाजत, ढोल - ताशांच्या गजरात शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावाबाहेरील विहिरीजवळ कानुमातेचे विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.काथर्दा दिगरकाथर्दा दिगर, ता.शहादा येथे रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात कानुमातेची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान भाविकांनी रात्रभर जागरण करीत उत्साहपूर्ण वातावरणात उत्सव साजरा केला. सोमवारी सकाळी काढण्यात आलेल्या विसजर्न मिरवणुकीत डीजेच्या तालावर भाविकांनी ठेका धरीत उत्साहपूर्ण वातावरणात बसस्थानक परिसरातील नदीत  कानुबाई मातेला निरोप दिला.बोरदतळोदा तालुक्यातील बोरद परिसरात रविवारी सायंकाळी कानुमातेची उत्साहपूर्ण वातावरणात स्थापना करण्यात आली. या वेळी अनेकांनी कानुमातेने नवस पूर्ण केल्याने नवस फेडल्याचे दिसून  आले. तसेच कानुमातेच्या विविध गीतांवर महिला व पुरूषांनी तालधरीत रात्रभर जागरण केले. सोमवारी सकाळी आठ वाजेपासून गावात विसजर्न मिरवणुकींना सुरूवात झाली होती. या मिरवणुकीत डी.जे. व ढोल-ताशांच्या तालावर भाविकांनी ठेका धरीत कानुमातेला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप दिला.ब्राrाणपुरीब्राrाणपुरी, ता.शहादा येथे खान्देशची कुलस्वामिनी कानुमातेची स्थापना रविवारी उत्साहातपूर्ण वातावरणात करण्यात आली होती. या वेळी भाविकांनी रात्रीभर कानुमातेच्या विविध गीतांवर नृत्य करीत रात्रभर जागरण केले. दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजेपासून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी तरुण-तरुणाईनी फुगडी खेळून आनंद साजरा केला. रविवारी रात्री भजनासह नाच गाण्यांचे आयोजन करण्यात आले होते. कानुमाता उसत्वानिमित्त सर्वत्र चैतनाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.