नंदुरबार : यंदा दहावीचे अवघे दोन विद्यार्थी वगळता सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्याची अपेक्षा खरी ठरत आहे. आतापर्यंत दोन हजार ४१० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यामुळे आयटीआयला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच आयटीआयचे प्रवेश पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात शासकीय व खासगी आयटीआय मिळून चार हजारांपेक्षा अधिक जागा आहेत. यंदा दहावीच्या निकालाची वाढलेली टक्केवारी आयटीआयला तारून गेली आहे. परिणामी सर्वच ट्रेडसाठी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.
यंदा जास्त प्रतिसाद
n कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दहावीचा अंतर्गत मूल्यमापनावर निकाल लागल्याने, विद्यार्थ्यांना भरमसाठ गुण मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश घेण्याकडे कल वाढला आहे.
n जिल्ह्यात अकरावीच्या जागा १८ हजार आहेत. आणि विद्यार्थी २१ हजार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी आयटीआयला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
n सहज रोजगार मिळेल अशा ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. अर्जात ट्रेड भरताना ते सहज लक्षात येत आहे.
n नंदुरबार तालुक्यात ६१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ६०५ जणांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
n उर्वरित जिल्ह्यात अर्थात नवापूर तालुक्यात ६५४जणांनी नोंदणी करून ६३५ अर्ज पात्र, अक्कलकुवा तालुक्यात १७६नोंदणी असून १७० पात्र, धडगाव तालुक्यात २५३ नोंदणी व २४१ पात्र, तळोदा तालुक्यात २१८नोंदणी २०७ अर्ज ऑनलाइन पात्र ठरले आहेत.