शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धुरखेडा येथे बिबटय़ाच्या हल्ल्याने शेळी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 13:14 IST

धुरखेडा रस्त्यावरील घटना : वनविभागाचे दुर्लक्ष, प्रकाशा ग्रामस्थांमध्ये भीती

प्रकाशा : धुरखेडा रस्त्यावर बिबटय़ाने शेळीवर हल्ला करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दरम्यान, प्रकाशा गावाच्या परिसरात ठिकठिकाणी बिबटय़ा आढळून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. मात्र वनविभागाने बिबटय़ांच्या बंदोबस्ताकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.येथील रामनगरमधील रहिवासी शिवदास भाईदास भिल हे त्यांच्या मालकीच्या शेळ्या धुरखेडा रस्त्यावरील सचिन सखाराम चौधरी यांच्या शेताजवळ चारत होते. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास बिबटय़ाने एका शेळीवर हल्ला केल्याने मानेला जखम झाली. भिल यांनी शेळीला घरी आणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश देशमुख यांच्याकडून औषधोपचार केला. मात्र मानेला जखम असल्याने शेळी चारा खात नसल्याचे शिवदास भिल यांनी सांगितले.वैजाली रस्त्यावरील नवीन वसाहतीत सुरेश गोसावी यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी पहाटे ते बांधकामाच्या ठिकाणी जात असताना त्यांनाही बिबटय़ा आढळून आला. प्रकाशा-त:हावद रस्त्यावरही जे.के. पॅकेजिंग परिसरात चार ते पाच दिवसांपासून बिबटय़ा आढळून येत आहे. तेथेही एका शेळीवर बिबटय़ाने हल्ला केला असून पायाचे ठसेही आढळून आले. प्रकाशा-नांदरखेडा रस्त्यावर 10 दिवसांपासून प्रकाश हरी पाटील यांच्या शेतात बिबटय़ा आढळून येत असून रात्री गोमाई नदी किना:यावर फिरताना आढळून येतो. शेतशिवारातून बिबटय़ा आता गाव परिसरातही आढळून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. याबाबत वनविभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने  ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष घालून बिबटय़ाच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.